
INDIA Alliance Delhi Protest, Rahul Gandhi ECI March,
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीतील जनपथवर इंडिया अलायन्सच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या स्नेहभोजनानंतर, इंडिया आघाडीकडून आज (07)पुन्हा एकदा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
CJP Janatar-Mantar 2.0: चलो दिल्ली…! १० ऑक्टोबरपासून दिल्लीत जंतर मंतर सिझन 2 ; सौरव दास यांचे आवाहन
इंडिया आघाडीच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर रेस्टॉरंटबाहेर तीन बस आल्या असून विरोधी पक्षाचे खासदार एकेक करून बसमध्ये चढत आहेत. राहुल गांधी यांच्यासह इंडिया ब्लॉकचे खासदार बसमध्ये बसून निवडणूक आयोगाकडे रवाना होऊ शकतात, असे मानले जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे.
मंगळवारी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि आघाडीच्या खासदारांनी संसद भवन परिसरातून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला होता, परंतु आकाशवाणी भवनजवळ पोलिसांनी त्यांना अडवण्यात आले. त्यानंतर, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उशिरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आता, आघाडी पुन्हा एकदा मोर्चा काढण्याची तयारी करत आहे. खर्गे यांनी दिल्लीतील जनपथवर स्नेहभोजनाचे आयोजन केले होते, ज्याला काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) वेणुगोपाल, टीएमसीचे खासदार डेरेक ओ’ब्रायन, आरजेडीचे मनोज झा, सीपीएमचे जॉन ब्रिटास, जेएमएमचे विजय विजय आणि अनेक विरोधी पक्षांचे खासदार उपस्थित होते.
इंडिया आघाडीच्या बैठक आणि कालच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. काल, राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला. परंतु त्यांना आणि खासदार प्रियांका गांधी- वाड्रा आकाशवाणी भवन येथे अडवण्यात आले. यानंतर, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आकाशवाणी भवनच्या आवारात नऊ तास धरणे आंदोलन केले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर सोडून देण्यात आले.
कालच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज (7 ऑक्टोबर) दुपारी दिल्लीत इंडिया आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि आकाशवाणी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनी काश्मिरी गेट परिसरासाठी दोन सूचना जारी केल्या आहेत. त्यांच्या एक्स (X) खात्यावर पोस्ट केलेल्या एका सूचनेत, वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे की, दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (CEO) कार्यालयाबाहेर नियोजित आंदोलनामुळे बुधवारी दुपारी १२:०० ते ३:३० दरम्यान काश्मिरी गेट परिसरात वाहतुकीत व्यत्यय येऊ शकतो. काश्मिरी गेट येथील जुन्या सेंट स्टीफन्स कॉलेजच्या इमारतीत असलेल्या सीईओंच्या कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे. त्यामुळे काश्मिरी गेट आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीवर परिणाम होईल.