
IndiGo flight crisis affects political leaders travel to Nagpur for winter session
इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेचा फटका राज्यातील नेत्यांना देखील बसला आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला पोहचण्यासाठी नेत्यांची तारांबळ उडाली. उद्यापासून अधिनेशन असून आज (दि.07) चहापानचा कार्यक्रम आहे. त्यामुळे नेत्यांनी रेल्वे किंवा रस्त्याच्या मार्गानी नागपूर गाठण्यास सुरुवात केली. मुंबई – नागपूर आणि पुणे – नागपूर या महत्त्वाच्या मार्गावर उडाणे वारंवार रद्द होत असल्याने व तासंतास होत असलेल्या विलंबामुळे प्रवाशांसोबत आता मंत्री, आमदार अधिकारी यांनासुद्धा यांच्या परिणाम जाणवत आहे.
हे देखील वाचा : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून; शेतकरी कर्जमाफीसह ‘हा’ मुद्दा ठरणार चर्चेचा
विमान सेवा खोळंबल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अगदी 12 तासांहून अधिक काळ प्रवासी विमानतळावर न खाता पिता उभे राहिले होते. यामुळे प्रवाशांचा विमानतळावर मोठा गोंधळ देखील झाला. याचा फटका नेत्यांना देखील बसला. दोन दिवसांमध्ये नागपूरला पोहचवे लागणार असल्यामुळे नेत्यांनी रस्त्याने जाणे पसंत केले. अनेक आमदार व मंत्री समृद्धी महामार्गाच्या पर्याय स्वीकारून नागपुरात पोहोचतील आणि अधिवेशनात सहभागी होतील. काही आमदारांनी समृद्धी मार्गे नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी रेल्वेद्वारे जाण्याचे नियोजन केल्याचे समजते. तर काही मंत्री चार्टर विमानाने येणार असल्याचे समजते. दरम्यान इंडिगोमुळे मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडल्याचे दिसून आले.
हे देखील वाचा : गोव्यातील अग्नितांडवावर PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत
भारतीय रेल्वेने वाढवल्या फेऱ्या
वाढत्या प्रवाशांच्या संख्येला आणि विमान रद्दीकरणांना प्रतिसाद म्हणून, भारतीय रेल्वेने पुढील तीन दिवसांत 89 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या 100 हून अधिक फेऱ्या चालवतील, ज्यामुळे मुंबई, दिल्ली, पुणे, हावडा आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल. उत्तर रेल्वे (NER) दिल्ली आणि मुंबई दरम्यान सहा विशेष गाड्या चालवेल. या उपक्रमाचा उद्देश एकसंध प्रवास अनुभव प्रदान करणे आणि रेल्वे प्रवासाची वाढती मागणी पूर्ण करणे आहे. हिवाळा हंगाम आणि विमान रद्दीकरणामुळे वाढत्या प्रवाशांच्या संख्येला लक्षात घेता, भारतीय रेल्वेने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सज्ज झाले आहे. आजपासून, पुढील तीन दिवसांत, देशभरात 89 विशेष गाड्या चालवल्या जातील, ज्या 100 हून अधिक फेऱ्या करतील. या गाड्यांचा प्राथमिक उद्देश मुंबई, दिल्ली, पुणे, हावडा आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रवाशांचा प्रवास सुलभ करणे आहे.