
Is Dnyanesh Kumar helping Modi win elections?; Abhijit Deepke’s angry question
बुधवारी सकाळी जंतरमंतरवर सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना तिरंगा फडकावल्याप्रकरणी तुरुंगात पाठवण्यात आले. यावरून अभिजीत दिपके यांनी थेट केंद्र सरकारलाच धारेवर धरलं आहे. या पत्रकार परिषदेत विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा नेहा बोरा, ज्येष्ठ वकिल प्रशांत भूषण, ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांच्यासह अनेक विद्यार्थीही उपस्थित होते. यावेळी नेहा बोरा आणि अभिजीत दिपके यांनीही केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
CJP Protest : निवडणूक आयोगाच्या कारभारावरून कॉकरोच जनता पार्टी आक्रमक, मुंबईत आंदोलनाची घोषणा
अभिजीत दिपके म्हणाले की, ” आशुतोष आणि सौरव सकाळी सकाळी जंतरमंतर वर तिरंगा फडकावला तर त्यांना उचलून ताब्यात घेण्यात आलं. न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. तिरंगा फडकवणेही कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगण्यात आले तेही फक्त ज्ञानेश कुमारला वाचवण्यासाठी. ज्ञानेश कुमार नरेंद्र मोदींना नेमकं काय देत आहेत. तुम्ही दिल्ली ठप्प केली. रेल्वे, मेट्रो बंद केल्या. दिल्लीला तुम्ही पाकिस्तानची बॉर्डर करून टाकले आहे.
तुम्ही विद्यार्थ्यांना, तरुणांना रस्त्यावर फटफटत नेलं. विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्र्यांनाही अशी वागणूक दिली. एका ज्ञानेश कुमारांसाठी एवढ कशासाठी, ज्ञानेश कुमार मोदींसाठी एवढे महत्त्वाचे का आहेत. असे असेल तर ज्ञानेश कुमार नरेंद्र मोदींना निवडणूक जिंकून देत आहेत, असं आम्ही का मानू नये, निवडणूक जिंकू देत नसेल तर मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी एवढे प्रयत्न केले असते का, असा सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कोणाचेच ऐकत नाहीये, फक्त आपल्या राजकीय नेत्यांचे ऐकत आहेत. ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सर्व मशिनरी कामाला लावल्या. तेव्हापासून देशभरातील सर्व विद्यार्थी संघटना, दिल्लीच्या रस्त्यांवर तरुण लढत आहे. त्यांनाही रस्त्यांवर फरफटत नेलं गेल, नेहा, आयशा, विराज, इशारा या सर्वाना ओढत नेलं गेल. देशाचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, पिनाराई विजयन यांनाही दिल्लीच्या रस्त्यांवरुन फरफटत ओढत नेलं गेलं.” अशी टिकाही अभिजीत दिपके यांनी यावेळी केली.