Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देवेंद्र फडणवीस राम तर नितेश राणे हनुमान’; जैन मुनी निलेशचंद्र यांचा संदीप देशपांडेंवर पलटवार

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरून जैन मुनी निलेशचंद्र यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राम तर नितेश राणे हे त्यांचे हनुमान असल्याचे विधान त्यांनी केले.

  • By विवेक
Updated On: Jun 16, 2026 | 09:13 PM
‘देवेंद्र फडणवीस राम तर नितेश राणे हनुमान’; जैन मुनी निलेशचंद्र यांचा संदीप देशपांडेंवर पलटवार

‘देवेंद्र फडणवीस राम तर नितेश राणे हनुमान’; जैन मुनी निलेशचंद्र यांचा संदीप देशपांडेंवर पलटवार

Follow Us
Follow Us:

मुंबईतील रस्त्यांवर आणि सोसायट्यांमध्ये काढल्या जाणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे आणि जैन मुनी निलेशचंद्र यांच्यातील शाब्दिक संघर्ष आता अधिक तीव्र झाला असून निलेशचंद्र मुनी यांनी पुन्हा एकदा देशपांडेंवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्याबाबतही मोठे विधान केले.

जैन मुनींच्या स्वागतासाठी काही भागांत रस्त्यांवर आणि सोसायट्यांमध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या काढल्या जातात. मात्र या पट्ट्यांवर मनसेकडून आक्षेप घेतला जात असून अनेक ठिकाणी या पट्ट्यांवर काळा किंवा इतर रंग टाकण्यात आल्याने वाद अधिक वाढला आहे.

“काळा रंग टाकल्याने शनिदेव कुंडलीत बसला”

या वादावर प्रतिक्रिया देताना निलेशचंद्र मुनी यांनी संदीप देशपांडे यांच्यावर टीका केली. “संदीप देशपांडेंनी पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग टाकला, त्यामुळे शनिदेव त्यांच्या कुंडलीत बसला आहे,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच पर्यावरण आणि वृक्षारोपणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. “तुम्ही झाडे लावण्याबाबत बोलता, पण सर्वाधिक वृक्षारोपणाचा विक्रम जैन समाजाने केला आहे. दरवर्षी सर्वाधिक झाडे आम्हीच लावतो,” असेही ते म्हणाले.

जैन मुनींच्या पांढऱ्या पट्ट्यांवरून मनसे पुन्हा आक्रमक; संदीप देशपांडेंचा ‘हिरवी झाडे’ लावण्याचा प्रस्ताव

“देवाभाऊ राम आहेत, नितेश राणे हनुमान”

यावेळी नितेश राणे यांच्यावर होत असलेल्या टीकेलाही निलेशचंद्र मुनी यांनी उत्तर दिले. “काही लोक नितेश राणेंना हिरवा म्हणत टीका करतात. पण त्यांच्या रक्तात भगवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांना लाभले आहेत. जिथे हिरवा दिसेल तिथे भगवा करण्याची ताकद त्यांच्यात आहे,” असे त्यांनी म्हटले.

पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना प्रभू रामचंद्रांशी करत, “देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस हे राम आहेत, तर नितेश राणे हे त्यांचे हनुमान आहेत,” असे विधान केले.

Manda Mhatre vs Ganesh Naik : ‘मला जाणीवपूर्वक त्रास दिला जातो’; मंदा म्हात्रेंची फडणवीसांकडे तक्रार, नाईकांवर गंभीर आरोप

देशपांडे-निलेशचंद्र वाद आधीपासूनच चर्चेत

दरम्यान, संदीप देशपांडे आणि निलेशचंद्र मुनी यांच्यातील वाद नवीन नाही. याआधीही दोघांनी एकमेकांवर थेट टीका केली होती. “निलेशचंद्र मुनी कोणत्या शाळेत शिकले आहेत, हे मला जाणून घ्यायचे आहे,” असे म्हणत संदीप देशपांडेंनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना निलेशचंद्र मुनी यांनी, “तुम्ही मला बोलवा, मग मी माझे शिक्षण काय आहे ते सांगतो,” असा पलटवार केला होता. पांढऱ्या पट्ट्यांच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता सामाजिक आणि राजकीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला असून पुढील काही दिवसांत या प्रकरणावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Jain muni nileshchandra on sandeep deshpande white stripes row devendra fadnavis nitesh rane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 09:12 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Nitesh Rane
  • sandip deshpande

संबंधित बातम्या

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा दुसरा हप्ता खात्यात, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
1

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा दुसरा हप्ता खात्यात, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान
2

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका
3

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’
4

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.