Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीतील आंदोलनावर सरकारची पहिली मोठी प्रतिक्रिया; जे.पी. नड्डांचे आंदोलकांना आवाहन, ‘आंदोलन मागे घ्या’

नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दिल्लीतील आंदोलनावर केंद्र सरकारने पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आंदोलकांशी चर्चा झाल्याचे सांगत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

  • By विवेक
Updated On: Jul 20, 2026 | 06:38 PM
दिल्लीतील आंदोलनावर सरकारची पहिली मोठी प्रतिक्रिया;

दिल्लीतील आंदोलनावर सरकारची पहिली मोठी प्रतिक्रिया;

Follow Us
Follow Us:
  • जे.पी. नड्डांची मोठी प्रतिक्रिया, आंदोलकांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा
  • धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह CJP च्या तीन प्रमुख मागण्या
  • चर्चेसाठी दोन तास प्रतीक्षा करावी लागल्याचा सीजेपीचा आरोप
 

नीट पेपरफुटीच्या कथित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर गेल्या ३० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाने आता अधिक आक्रमक स्वरूप धारण केले असून आज कॉकरोच जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती.

याआधीच पोलिसांनी जंतरमंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवत बॅरिकेडिंग केले. आंदोलनकर्त्यांना ठरावीक क्षेत्रात रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही काही समर्थक संसद भवन परिसराच्या दिशेने पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’; दिल्लीतील आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा मोदी सरकारवर घणाघात, ‘लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे’

आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे – जे.पी. नड्डा

या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा पार पडली असून त्यांच्या मागण्या सरकारकडे अधिकृतपणे सादर करण्यात आल्या आहेत. नड्डा म्हणाले की, सकाळी सुमारे ११.५० वाजल्यापासून चर्चा सुरू होती. शिष्टमंडळाशी शांततापूर्ण वातावरणात संवाद झाला असून दुपारी निवेदनही स्वीकारण्यात आले. जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

आंदोलनकर्त्यांनी सरकारसमोर काही प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये:

  • सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका
आंदोलनकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली आहे.
  • धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मदत
आत्महत्या केलेल्या NEET परीक्षार्थींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

CJP Protest: ‘मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही; जे.पी. नड्डा यांच्या भेटीनंतर सौरभ दास यांची प्रतिक्रीया

चर्चेनंतरही सीजेपीचा सरकारवर आरोप

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी चर्चेच्या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी दावा केला की, चर्चेसाठी बोलावण्यात आल्यानंतर त्यांना जवळपास दोन तास प्रतीक्षा करावी लागली आणि त्यानंतर केवळ दहा मिनिटांची भेट देण्यात आली.

सौरभ दास यांनी सर्व खासदारांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भूमिका घेण्याचे आवाहन केले. तसेच आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दिल्लीतील हे आंदोलन आणि सरकार-आंदोलकांमधील संवाद यामुळे पुढील काही दिवसांत राष्ट्रीय राजकारणात या मुद्द्यावर मोठी चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Jp nadda appeals to withdraw delhi jantar mantar protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • Cockroach Janata Party
  • JP Nadda
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
1

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Abhijeet Dipke On MPSC Protest: पेपरफुटीविरोधात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; ‘CJP’चे अभिजित दीपकेंची मोठी घोषणा
2

Abhijeet Dipke On MPSC Protest: पेपरफुटीविरोधात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; ‘CJP’चे अभिजित दीपकेंची मोठी घोषणा

Maratha Reservation: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा
3

Maratha Reservation: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.