Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शिंदे राम तर फडणवीस लक्ष्मण’; खासदार ज्योती वाघमारे यांच्या वक्तव्याने महायुतीत नव्या वादाची ठिणगी

महायुतीतील मोठा पक्ष कोणता, यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदेंना 'राम' आणि देवेंद्र फडणवीसांना 'लक्ष्मण' अशी उपमा दिली. तसेच राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य करत त्यांनी नव्या राजकीय चर्चेला सुरुवात केली.

  • By विवेक
Updated On: Jun 28, 2026 | 05:52 PM
'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?' चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; 'रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती'

'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?' चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; 'रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती'

Follow Us
Follow Us:
  • खासदार ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदेंना ‘राम’ आणि देवेंद्र फडणवीसांना ‘लक्ष्मण’ अशी उपमा दिली.
  • राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचा दावा करत महायुतीतील चर्चेला नवे वळण दिले.
  • उद्धव ठाकरे यांना ‘रावण’ आणि संजय राऊत यांना ‘कैकयी’ अशी उपमा देत विरोधकांवरही टीका केली.
 

महायुतीतील मित्रपक्षांमध्ये मोठा पक्ष कोणता, यावर सुरू असलेल्या चर्चेला शिवसेना राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी नवं वळण दिलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘राम’, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘लक्ष्मण’ अशी उपमा दिली. तसेच राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ आहे, असेही त्यांनी म्हटले.

त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील भाजप-शिवसेना संबंधांवर पुन्हा एकदा चर्चा रंगली असून राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सहा खासदारांच्या प्रवेशानंतर ‘मोठा पक्ष’ चर्चेला उधाण

अलीकडेच शिवसेना (शिंदे गट)मध्ये सहा खासदारांच्या प्रवेशानंतर राज्यात महायुतीतील सर्वात मोठा पक्ष कोणता, यावर चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्योती वाघमारे यांनी शिवसेनाच राज्यातील मोठा भाऊ असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या या विधानामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्ये सुप्त स्वरूपात सुरू असलेला मोठ्या पक्षाचा वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे.

‘भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी’; परभणीत उद्धव ठाकरे यांचा घणाघात, फडणवीस-गडकरींवरही निशाणा

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही टीका

ज्योती वाघमारे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. त्यांनी उद्धव ठाकरे यांना ‘रावण’, तर संजय राऊत यांना ‘कैकयी’ अशी उपमा देत जोरदार टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

भाजपची भूमिका काय असणार?

ज्योती वाघमारे यांच्या वक्तव्यानंतर भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, महायुतीतील मोठा पक्ष कोणता, या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत. भाजप या वक्तव्याला कशाप्रकारे उत्तर देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘गडकरींप्रमाणेच फडणवीसांचे पंतप्रधानपदाचे पंख…’, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा, तर आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Web Title: Jyoti waghmare shinde ram fadnavis lakshman mahayuti controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Jyoti Waghmare
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही बेकायदेशीर? कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद
1

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही बेकायदेशीर? कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद

Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र’ , नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट
2

Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र’ , नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

Anil Desai Fights With Naresh Mhaske: अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावले;  ठाकरे-शिंदे गटात हायव्होल्टेज ड्रामा 
3

Anil Desai Fights With Naresh Mhaske: अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावले; ठाकरे-शिंदे गटात हायव्होल्टेज ड्रामा 

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
4

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.