Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC Politics: मोदींच्या फोटोवरून KDMC महासभेत राडा; सभा तहकूब, ‘एवढाच विरोध तर सत्तेतून बाहेर पडा’ मनसेचा भाजपला टोला

KDMC Politics: पुण्यातील एका शाळेत मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढल्याच्या प्रकरणाचे पडसाद कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत उमटले. भाजप गटनेते शशिकांत कांबळे यांनी महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर महापौर हर्षाली चौधरी यांनी सभा तहकूब केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 09, 2026 | 04:31 PM
मोदींच्या फोटोवरून KDMC महासभेत राडा; सभा तहकूब, ‘एवढाच विरोध तर सत्तेतून बाहेर पडा’ मनसेचा भाजपला टोला

मोदींच्या फोटोवरून KDMC महासभेत राडा; सभा तहकूब, ‘एवढाच विरोध तर सत्तेतून बाहेर पडा’ मनसेचा भाजपला टोला

Follow Us
Follow Us:
  • मोदींच्या ‘फोटो’ प्रकरणाचे KDMCत पडसाद
  • भाजपच्या मागणीनंतर महासभा तहकूब, मनसे-काँग्रेस आक्रमक
  • KDMCत मनसेचा भाजपवर हल्लाबोल, युतीतील मतभेद चव्हाट्यावर
 

KDMC Politics : पुण्यातील एका शाळेत मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Photo) यांचा फोटो काढल्याच्या प्रकरणावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापले आहे. या वादाचे पडसाद बुधवारी (9 सप्टेंबर 2026) झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत उमटले. भाजपने या प्रकरणाचा निषेध करत महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्याची मागणी केली. अखेर महापौर हर्षाली चौधरी यांनी महासभा तहकूब केली.(KDMC Politics)

भाजपकडून महासभा तहकूब करण्याचा प्रस्ताव

बुधवारी आयोजित महासभेत भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनी मोदींच्या फोटोप्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी या घटनेचा निषेध करत महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. महापौर हर्षाली चौधरी यांनी संबंधित प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगत महासभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे भाजपच्या या भूमिकेला शिवसेना शिंदे गटासह शिवसेना ठाकरे गटानेही पाठिंबा दिला. मात्र, मनसे आणि काँग्रेसने सभा तहकूब करण्याच्या निर्णयाला विरोध करत भाजपवर जोरदार टीका केली.

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

सत्तेतून मनसेला बाहेर काढण्याची भाजपची मागणी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसे सत्तेत आहेत. पुण्यातील फोटोप्रकरणानंतर भाजपने मनसेला सत्तेतून बाहेर काढण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाकडे केली होती. मात्र, शिंदे गटाने ही मागणी मान्य केली नाही. उलट या मुद्द्यावर भाजपच्या भूमिकेवरच टीका करण्यात आली होती. त्यामुळे केडीएमसीच्या महासभेत भाजप कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

‘सत्तेतही राहायचे आणि विरोधही करायचा’

काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी महासभा तहकूब केल्याच्या निर्णयावरून भाजपला लक्ष्य केले. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महासभा आयोजित केली जाते; मात्र राजकीय मुद्द्यावर सभा तहकूब करणे म्हणजे केवळ नाटक असल्याची टीका त्यांनी केली. भाजपचा मनसेला एवढाच विरोध असेल, तर सत्तेतून बाहेर का पडत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सत्तेत राहून त्याचवेळी विरोध दाखवण्याची भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

मनसेने भाजपला सुनावले

मनसेचे गटनेते प्रल्हाद म्हात्रे यांनीही महासभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘एवढा विरोध आहे तर सत्तेतून बाहेर का पडत नाही? सत्तेची मलाई खाण्यासाठी तुम्ही सत्तेत आहात. महापौर आम्ही बसवला आहे. आमच्याकडे बहुमत आहे. तुम्ही सत्तेतून बाहेर पडा,’ अशा शब्दांत म्हात्रे यांनी भाजपला आव्हान दिले.

सत्ताधारी युतीतील मतभेद पुन्हा उघड

मोदींच्या फोटोप्रकरणामुळे केडीएमसीतील सत्ताधारी पक्षांमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. एकीकडे शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसेची सत्ता कायम असताना दुसरीकडे राजकीय मुद्द्यांवर तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष होत असल्याचे चित्र आहे. महासभा तहकूब करण्याच्या मुद्द्यावर मनसेने थेट भाजपलाच सत्तेतून बाहेर पडण्याचे आव्हान दिल्याने हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. आता या वादाचा आगामी काळात केडीएमसीतील सत्तासमीकरण आणि तीन पक्षांच्या संबंधांवर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

KDMC News: तीन वर्षांपासून कोट्यवधींची देणी थकीत; ‘आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका’, ठेकेदारांचा आक्रोश

Web Title: Kdmc general body adjourned over narendra modi photo row mns slams bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • amit thackeray
  • BJP
  • KDMC
  • MNS

संबंधित बातम्या

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका
1

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला
2

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार
3

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!
4

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.