Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC: ऐन निवडणुकीत कल्याणमध्ये बेकायदा होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर; KDMC कडून मात्र संथगतीने कारवाई

कल्याण विधानसभा मतदारसंधात बॅनर प्रकरणावरुन संवेदनशील वातावरण तयार झालं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 17, 2024 | 04:42 PM
KDMC: ऐन निवडणुकीत कल्याणमध्ये बेकायदा होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर; KDMC कडून मात्र संथगतीने कारवाई

KDMC: ऐन निवडणुकीत कल्याणमध्ये बेकायदा होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर; KDMC कडून मात्र संथगतीने कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठिकठिकाणी प्रचार सभा आणि बॅनरबाजी करण्यात येत आहेत. मात्र निवडणुकांना काही दिवस बाकी राहिले असतानाच कल्याणमधील वातावरण संवेदनशील झाल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी काही अज्ञातांनी राकेश मुथा यांच्या बॅनरची विटंबना केली. याचे तीव्र पडसाद कल्याण आणि कल्य़ाण ग्रमीण भागात पाहायला मिळत आहेत.

विधानसभेच्या प्रचारादरम्यान सर्वच पक्षांकडून बॅनरबाजी होत आहे. मात्र राकेश मुथा यांच्या बॅनरची विटंबना केल्याप्रकरणानंतर आता पालिकेने कारवाई सुकु केली आहे. कल्याण डोंबिवलीत निवडणूकीच्या पाश्वभूमीवर होर्डिंग, बॅनर ,झेंडे लावण्यात आले आहेत. मात्र यामध्ये बेकायदेशीरपणे लावलेल्या होर्डिंग ,बॅनर आणि  झेंड्यामुळे शहराचे विद्रूपीकरण सुरु आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात निवडणूक पर्यवेक्षकाने रस्त्यावर, चौकात, विद्युत खांबावर लावण्यात आलेले बेकायदेशीर बॅनर होर्डिंग झेंडे काढण्याचे आदेश निवडणूक निर्णयन अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी ही बाब महापालिका प्रशासनास कळविली आहे. महापालिकेने बॅनर ,होर्डिंग आणि झेंडे काढण्याची कारवाई केली आहे. याचपार्श्वभूमीवर  मनपा प्रशासनावर गंभीर आरोप देखाील केले जात आहेत.   महापालिकेकडून बेकायदा होर्डिंग, बॅनर, झेंडे काढण्याची कारवाई केली जात नाही असं  राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

निवडणुकीच्या बातम्यांसाठी इथे क्लीक करा 

कल्याण ग्रामीण मतदार संघात निवडणूकीच्या प्रचाराचा रंग चढला आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असताना मतदारसंघात विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी त्यांच्या प्रचारासाठी बडे होर्डिंग, बॅनर आणि झेंडे लावले आहे. यामध्ये बहुतांश हाेर्डिंग, बॅनर आणि झेंडे हे बेकायदेशीर आहे . बेकायदेशीर होर्डिंग बॅनर आणि झेंडे काढण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकरणी कल्याण ग्रामीण मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक कुमार पुरुषोत्तम यांच्याकडे यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या. याबाबत कल्याण ग्रामीण मतदार संघाचे निवडणूक निर्णयन अधिकाऱ्यांकडे लेखी पत्र देऊन विचारणा केली.

महायुतीसंदर्भात बातम्यांसाठी इथे  क्लीक करा

निवडणूक निर्णयन अधिकारी गुजर यांनी निवडणूक निरिक्षक कुमार पुरुषोत्तम यांच्या पत्राची गंभीर दखल घेत महापालिकेस यासंदर्भात विचारणा केली. महापालिकेने या प्रकरणी काय कार्यवाही केली याचा लेखी अहवाल त्यांनी दिला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात महापालिका प्रसासनाने 7 हजार 408 बॅनर, 654 होर्डिंग आणि 8हजार 213झेंडे काढण्याची कारवाई केली आहे. ही कारवाई गेल्या तीन दिवसातील आहे. 20तारखेला मतदान आहे. येत्या तीन दिवसात बेकायदा होर्डिंग बॅनर आणि झेंडे यांच्या विरोधातील कारवाई अधिक गतीमान करावी,  अशी मागणी करण्यात येत आहे. बेकायदा होर्डिंग, बॅनर, झेंडे लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाईसाठी विलंब करु नये, असे आदेश निवडणूक आयोगाने पालिकेला दिले आहेत.

 


Web Title: Kdmc illegal hoarding issue raised in kalyan during general elections but slow action from kdmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 03:00 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly Election
  • maharashtra election 2024
  • political news
  • Rakesh Mutha

संबंधित बातम्या

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान
1

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान

PMO Of India : आता थेट साधता येणार PM मोदींशी संवाद; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?
2

PMO Of India : आता थेट साधता येणार PM मोदींशी संवाद; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?

Marathi Breaking Live Updates : भारत-कॅनडा संबंध पुन्हा पूर्ववत होणार; आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग
3

Marathi Breaking Live Updates : भारत-कॅनडा संबंध पुन्हा पूर्ववत होणार; आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुतीसोबतच; आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केला विश्वास 
4

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुतीसोबतच; आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केला विश्वास 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.