Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC स्थायी समितीच्या सभेला अधिकारी गायब! सभापती-सदस्यांना जुमानत नाहीत का? अखेर सभा काही काळासाठी तहकूब

KDMC News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेला महत्त्वाचे अधिकारी गैरहजर राहिल्याने सभा काही काळासाठी तहकूब करण्याची वेळ सभापती आणि सदस्यांवर आली. अधिकारी उपस्थित नसल्याने नगरसेवकांना प्रतीक्षा करावी लागली. या प्रकारामुळे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले....

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 21, 2026 | 05:03 PM
KDMC स्थायी समितीच्या सभेला अधिकारी गायब! सभापती-सदस्यांना जुमानत नाहीत का? अखेर सभा काही काळासाठी तहकूब

KDMC स्थायी समितीच्या सभेला अधिकारी गायब! सभापती-सदस्यांना जुमानत नाहीत का? अखेर सभा काही काळासाठी तहकूब

Follow Us
Follow Us:
  • केडीएमसी स्थायी समितीची सभा तहकूब करण्याची वेळ
  • सभापती-सदस्य प्रतीक्षेत
  • स्थायी समितीच्या सभेतील गैरहजेरीने चर्चांना उधाण
KDMC News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महापालिकेच्या महत्त्वाच्या स्थायी समितीच्या सभेला संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने सभापती आणि सदस्यांना सभा काही काळासाठी तहकूब करण्याची वेळ आली. अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत नगरसेवकांना सभागृहात ताटकळत बसावे लागल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील समन्वयाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना, भाजप आणि मनसे सत्तेत आहेत. स्थायी समितीच्या सभापतीपदी ज्येष्ठ नगरसेवक मल्ल शेट्टी आहेत. महापालिकेच्या आर्थिक आणि प्रशासकीय दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा अपेक्षित असते. मात्र, या बैठकीलाच आवश्यक अधिकारी उपस्थित नसल्याने कामकाज सुरू करण्यात अडचण निर्माण झाली.

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?

अधिकारी गैरहजर, नगरसेवक प्रतीक्षेत

स्थायी समितीची सभा सुरू होण्याची वेळ झाली तरी महत्त्वाचे अधिकारी सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे विविध विषयांवर चर्चा आणि अधिकाऱ्यांकडून उत्तरे मिळणे शक्य नसल्याने अखेर सभा काही काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकारामुळे स्थायी समितीचे सभापती आणि सदस्यांना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची प्रतीक्षा करावी लागली. यानंतर महापालिका वर्तुळात ‘केडीएमसीचे अधिकारी स्थायी समिती सभापती आणि सदस्यांना जुमानत नाहीत का?’ असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

आयुक्तांनाही सुरुवातीला माहिती नव्हती – मंदार हळबे

या प्रकरणावर भाजपचे नगरसेवक मंदार हळबे यांनी प्रतिक्रिया दिली. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत महापालिका आयुक्तांकडे विचारणा केली असता सुरुवातीला त्यांच्याकडेही याबाबत माहिती नव्हती, असे हळबे यांनी सांगितले. त्यानंतर सदस्यांनी आयुक्तांसोबत चर्चा केली. काही अधिकारी मंत्रालयात गेले असल्याचे तसेच अन्य अधिकारी कुठे आहेत, यासंदर्भातील माहिती आयुक्तांनी सदस्यांना दिल्याचे हळबे यांनी सांगितले. अधिकारी आल्यानंतर सभा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासन-लोकप्रतिनिधींमधील समन्वयावर प्रश्न

महापालिकेतील स्थायी समिती ही निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाची समिती मानली जाते. अशा समितीच्या सभेला आवश्यक अधिकारीच उपस्थित राहत नसतील, तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय आहे का, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे अधिकारी वेळेवर उपस्थित न राहिल्याने सभा तहकूब करावी लागणे आणि लोकप्रतिनिधींना त्यांच्या प्रतीक्षेत बसावे लागणे यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कार्यपद्धतीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकाराची महापालिका प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जाते का आणि भविष्यात स्थायी समितीच्या बैठकांना संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे लक्ष लागले आहे.

Sugar Price Hike: साखरेत पाणी मुरतयं! अचानक झालेल्या साखर दरवाढीवर राजू शेट्टींनी व्यक्त केली शंका

Web Title: Kdmc standing committee meeting adjourned officials absent kalyan dombivli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Dombivli
  • kalyan
  • KDMC
  • Politics

संबंधित बातम्या

ध्रुव राठी आणि अभिजीत दीपके एकत्र! बंगळुरू-दिल्ली आंदोलनाने राजकीय वातावरण तापणार!
1

ध्रुव राठी आणि अभिजीत दीपके एकत्र! बंगळुरू-दिल्ली आंदोलनाने राजकीय वातावरण तापणार!

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा
2

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा

KDMC News: डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग, कर्मचारीही गायब! उपायुक्तांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये सुमित एलकोच्या कामाची पोलखोल
3

KDMC News: डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग, कर्मचारीही गायब! उपायुक्तांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये सुमित एलकोच्या कामाची पोलखोल

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन
4

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.