Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“केवळ माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला असं म्हणून चालत नाही,” सभागृहातील उपस्थितीवरून भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हजेरीबाबतही धक्कादायक माहिती समोर येत असून उद्धव ठाकरे यांनी गेल्या चार वर्षात केवळ ३१.५८ टक्के उपस्थिती नोंदवली आहे.

  • By विवेक
Updated On: May 18, 2026 | 09:49 PM
Keshav Upadhye slams Uddhav Thackeray over attendance in Vidahan Parishad, Uddhav Thackeray Vidhan parishad Attendance,

Keshav Upadhye slams Uddhav Thackeray over attendance in Vidahan Parishad, Uddhav Thackeray Vidhan parishad Attendance,

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यांच्या उपस्थितीची माहिती समोर
  • उद्धव ठाकरे यांनी गेल्या चार वर्षात केवळ ३१.५८ टक्के उपस्थिती नोंदवली
  • भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर टीका
महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यांच्या उपस्थितीची माहिती समोर आली आहे. यात काही आमदारांनी सभागृहात १०० टक्के हजेरी लावून आदर्श निर्माण केला आहे. काही आमदारांच्या उपस्थितीवरून मात्र आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हजेरीबाबतही धक्कादायक माहिती समोर येत असून उद्धव ठाकरे यांनी गेल्या चार वर्षात केवळ ३१.५८ टक्के उपस्थिती नोंदवली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अश्यातच भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर चांगलीच आगपाखड केली आहे.

सोमवारी (१८ मे) विधान भवनातील सदस्यांच्या उपस्थितीची माहिती समोर आली. यात उद्धव ठाकरे यांची गेल्या चार वर्षातील सभागृहातील उपस्थितीही जाहीर करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षात त्यांनी केवळ ३१.५८ टक्के इतकीच उपस्थिती नोंदवली असल्यामुळे आता त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत, “केवळ “माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, पक्षाचे चिन्ह चोरले” अशा भावनिक वल्गना करून सहानुभूती मिळत नसते, त्यासाठी सातत्याने मेहनत, कार्यकर्त्यांशी संवाद आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो,” अश्या तिखट शब्दांत टीका केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सभागृहातील ‘अटेंडन्स कार्ड’ सादर झाले असून उपस्थितीची आकडेवारी थक्क करणारी आहे.. असे प्रतिनिधी जनता कसे स्वीकारणार ? केवळ “माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, पक्षाचे चिन्ह चोरले” अशा भावनिक वल्गना करून सहानुभूती मिळत नसते. वडिलोपार्जित पक्ष मिळणं… — Keshav Upadhye (@keshavupadhye) May 18, 2026

काय म्हणाले केशव उपाध्ये?

आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत केशव उपाध्ये म्हणाले, “माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सभागृहातील ‘अटेंडन्स कार्ड’ सादर झाले असून उपस्थितीची आकडेवारी थक्क करणारी आहे.. असे प्रतिनिधी जनता कसे स्वीकारणार ? केवळ “माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, पक्षाचे चिन्ह चोरले” अशा भावनिक वल्गना करून सहानुभूती मिळत नसते. वडिलोपार्जित पक्ष मिळणं वेगळं आणि तो सक्षमपणे चालवणं वेगळं! त्यासाठी सातत्याने मेहनत, कार्यकर्त्यांशी संवाद आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आता हे बघा, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केवढी मोठी संधी आली होती..मुख्यमंत्रीपद चालून आले..बिनविरोध विधान परिषद मिळाली..पण त्या संधीचं रूपांतर जनाधारात करण्याऐवजी उबाठासैनिकांच्या हाती आले काय तर भ्रमाचा भोपळा? ‘मीच राजा आणि सगळ्यांनी म्हणा मला महाराजा’ असे फार दिवस चालत नसते, साहेब.. हातात आलेल्या संधीचे सोने करण्याऐवजी तोंडाच्या वाफा दवडून आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवर गरळ ओकून चालत नसते..जनतेला विकास पाहिजे असतो आणि तो देणारे ‘विकास पुरुष’ महाराष्ट्रातील जनतेने ओळखले आहेत, त्यांना तळागाळापासून सर्वत्र कौल मिळत आहे !”

“आपली भूमिका, आपले कर्तृत्व, आपल्या दृष्टिकोन दाखवण्यासाठी विधिमंडळ असते. पण, त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती लावली तर.. चार भिंतीआड बसणाऱ्यांना जनता नेहमीच झिडकारते, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.. आणि त्याचे रेकॉर्डही आता उपलब्ध झाले आहे,” अश्या शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

उद्धव ठाकरेंची केवळ ३१.५८ टक्के इतकीच उपस्थिती

विधान परिषदेत २०२० मध्ये सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकूण १३३ बैठकांपैकी फक्त ४२ बैठकांना हजेरी लावली आहे. म्हणजेच टक्केवारी काढल्यास त्यांची एकूण टक्केवारी फक्त ३१.५८ इतकीच निघते. २०१९ साली मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतली होती. पण कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे काळातील उपस्थितीची नोंद उपलब्ध नाही. त्यानंतर, २०२२ साली आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पावसाळी अधिवेशनात फक्त एकदाच उपस्थिती दर्शवली. त्यानंतर देखील २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १६ पैकी फक्त ४ बैठकींना ते उपस्थित असल्याची नोंद आहे.

ठाकरे गटाचा खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का?

Web Title: Kesahv upadhye slams uddhav thackeray over attendance in vidahan parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 09:49 PM

Topics:  

  • Maharashtra vidhansabha
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्षही त्यांचाच होणार का?’; देवदत्त कामतांचा सुप्रीम कोर्टात थेट सवाल, ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद
1

‘5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्षही त्यांचाच होणार का?’; देवदत्त कामतांचा सुप्रीम कोर्टात थेट सवाल, ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न
2

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी
3

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून राहुल नार्वेकर विरुद्ध कपिल सिब्बल; ‘बिनबुडाचे आरोप’, विधानसभा अध्यक्षांचा पलटवार
4

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून राहुल नार्वेकर विरुद्ध कपिल सिब्बल; ‘बिनबुडाचे आरोप’, विधानसभा अध्यक्षांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.