Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सुषमा अंधारेंनी कठीण काळात पक्षाची साथ दिली, पण…’; सचिन अहिरांचे वक्तव्य चर्चेत, सुषमा अंधारे शिंदेंच्या सेनेत जाणार?

शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सुषमा अंधारे आणि बाबाजी काळे यांच्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे. सुषमा अंधारेंनी कठीण काळात पक्षासाठी शंभरहून अधिक सभा घेतल्या, मात्र त्यांच्या नावाचा विचारच झाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

  • By विवेक
Updated On: Jul 05, 2026 | 05:05 PM
'सुषमा अंधारेंनी कठीण काळात पक्षाची साथ दिली, पण...'; सचिन अहिरांचे वक्तव्य चर्चेत, सुषमा अंधारे शिंदेंच्या सेनेत जाणार?

'सुषमा अंधारेंनी कठीण काळात पक्षाची साथ दिली, पण...'; सचिन अहिरांचे वक्तव्य चर्चेत, सुषमा अंधारे शिंदेंच्या सेनेत जाणार?

Follow Us
Follow Us:

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि बाबाजी काळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दोन्ही नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करत पक्षातील निर्णयप्रक्रियेवरही अप्रत्यक्ष भाष्य केले.

बाबाजी काळे यांच्याबाबत काय म्हणाले?

बाबाजी काळे आणि सुषमा अंधारे भविष्यात शिंदे गटात येणार का, असा प्रश्न विचारला असता सचिन अहिर म्हणाले, “बाबाजी काळे यांनी दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाला भरभरून दिले आहे. त्यांनी २० आमदारांपैकी सर्वाधिक ५२ हजारांचे लीड मिळवून दिले. त्यामध्ये त्यांचे स्वतःचे कौशल्य होते, तर पक्षाने जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून त्यांना साथही दिली. पुढे काय करायचे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल.”

20 कोटींच्या ऑफरच्या दाव्यावर आमदार धीरज लिंगाडे यांची पहिली प्रतिक्रिया; ‘राऊतांचा दावा पूर्णपणे खोटा’

कार्यकर्त्यांबाबतही व्यक्त केली खंत

सचिन अहिर यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांबाबतही भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “सत्ता असतानाही माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित संधी देता आली नाही, अशी भावना त्यांच्या मनात आहे. कोविड काळामुळे महामंडळांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि याचे शल्य आजही आहे.”

सुषमा अंधारेंबाबत मोठा खुलासा

सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना सचिन अहिर यांनी २०२२ मधील सत्तांतराच्या काळातील एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “महाविकास आघाडी सरकार पडत असताना दुसऱ्याच दिवशी सुषमा अंधारे यांचा मला फोन आला. तिसऱ्या दिवशी मी त्यांना मातोश्रीवर घेऊन गेलो. त्यावेळी त्यांनी ‘मला काही नको, पण अशा कठीण प्रसंगी मी पक्षासोबत उभी राहीन,’ असे सांगितले होते.”

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, ‘पक्षाचे…’

‘100 पेक्षा जास्त सभा घेतल्या, पण…’

अहिर पुढे म्हणाले, “सुषमा अंधारेंनी पक्षासाठी १०० हून अधिक सभा घेतल्या. त्या अत्यंत डॅशिंग प्रवक्त्या आहेत. त्यांनी अनेक मुद्दे आक्रमकपणे मांडले, भ्रष्टाचाराचे विषय उचलून धरले. मात्र, पक्षाने त्यांच्या नावाचा पुरेसा विचारच केला नाही, ही खंत आहे.” सचिन अहिर यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत राजकारण आणि पक्षातील नेतृत्वाच्या निर्णयांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Sachin ahir on sushma andhare babaji kale shiv sena uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • Sachin Ahir
  • shivsena
  • Shivsena UBT
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Amravati MLC Election 2026: महायुतीत बंडाचा झेंडा! अमरावती शिक्षक मतदारसंघातून श्रीकांत देशपांडेंचे दोन अर्ज; ‘तिकीट न मिळालं…’
1

Amravati MLC Election 2026: महायुतीत बंडाचा झेंडा! अमरावती शिक्षक मतदारसंघातून श्रीकांत देशपांडेंचे दोन अर्ज; ‘तिकीट न मिळालं…’

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द
2

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
3

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
4

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.