ठाकरे गटाचा खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का?
एकीकडे शिवसेनेचे नेते ऑपरेशन टायगरबाबत चर्चा करताना दिसत आहेत. अश्यातच शिवसेना उबाठा पक्षाचे जवळपास सात खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. अश्यातच आता हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे वृत्त समोर येत आहे.
मतदारसंघातील विकासकामे आणि निधीसाठी हि भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. आष्टीकरांच्या कार्यकर्त्यांकडून तसा दावा करण्यात येत आहे. परंतु या भेटीमागील नेमके कारण काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या भेटीमुळे ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. याआधीही संजय फिना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती परभणीचे आमदार संजय जाधव हेसुद्धा ठाकरे गटाला रामराम करून शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत.
गेल्या काही काळापासून शिवसेना उबाठा पक्षाचे जवळपास सात खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या सात खासदारांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत वक्तव्य करून असा कोणताही पक्षप्रवेश होणार नसल्याची माहिती याआधी दिली होती. तसेच ऑपरेशन टायगर सक्रिय नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे या पक्षांतराच्या चर्चाना पूर्णविराम मिळाला होता. आता नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या भेटीवरून याबाबत पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत.
रुपयाची घरसण होत असताना आता पंतप्रधानांची इज्जत घसरत नाही का? काँग्रेसचा संतप्त सवाल






