‘बाळासाहेबांचा अवमान केलेलाच नाही’; वादग्रस्त वक्तव्यावर किरण पावसकरांचे स्पष्टीकरण, ठाकरे गटावर पलटवार
ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सहा फुटीर खासदारांनी काल (सोमवार, 22 जून) एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असलेले शिवसेना नेते किरण पावसकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. “मुलाला सांभाळा, नातवाला सांभाळा… हे काय पाळणाघर आहे का?” असे वक्तव्य केल्याने पावसकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. आता किरण पावसकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
यावेळी किरण पावसकर यांनी स्पष्टीकरण देत म्हंटले, “मी बाळासाहेबांविषयी बोललो नाही. मी बोललेल्या विधानाला बाळासाहेब ठाकरे यांच्या अवमानाशी जोडले जात असेल तर ते चुकीचे आहे. शिवसेनेची काँग्रेस झाली, तर मी हे दुकान बंद करून टाकेन असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तेही कधीतरी दाखवा. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत फिरत होते. तेव्हा त्या यात्रेत राहुल गांधी यांना ठाकरे गटाचे नेते मिठी मारायला गेले. त्यावेळी बाळासाहेबांचा विचार केला नाही.”
ते पुढे म्हणाले, “आमच्या शिवसेना पक्षातून बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करण्याचं कोणीही धाडस करणार नाही. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातही बाळासाहेबांचा अवमान करेल, असा माणूस सापडणार नाही. बाळासाहेबांमुळे आम्ही घडलो, त्यांनी आम्हाला पदं दिली. आम्ही मोठे झाले. ज्यांच्यामुळे आम्ही मोठे झालो, त्यांचा आम्ही अवमान कसा करणार. सध्या मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करतो आहे. अगोदर मी उद्धव ठाकरे यांच्या कामाला कंटाळून मी राष्ट्रवादीत गेलो होते. त्यावेळीही मी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी काहीही बोललो नव्हते. आता कसं काय बोलू शकेन,” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
“मी जर बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला तर एकनाथ शिंदे मला पक्षात ठेवतील का? शिवसेना पक्षात शिस्त ही सर्वात महत्त्वाची आहे. या शिस्तीचं पालन शिवसेनेत काटेकोरपणे केलं जातं, असे सांगत त्यांनी मी बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केलेला नाही,” असे सांगितले
“काल उबाठाचे सहा खासदारांनी ओरिजनल शिवसेनेत प्रवेश केला. आनंदच वातावरण काल होतं. दुसरीकडे दुःखाचं वातावरण होत असे पावसकर म्हणाले. हिंदूहृदय सम्राट तुम्ही म्हणत नाही. वंदनीय म्हणतात. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला. 19 तारखेच्या वर्धापन दिनी षण्मुखानंदमध्ये नेत्याने सांगितलं आतापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आता माझ्या मुलावर प्रेम करा त्यावर मी बोललो. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलं होत उद्धवला सांभाळा, आम्ही सांभाळल्याचे पावसकर म्हणाले. मी बरंच काही भोगलं आहे,” असे ते म्हणाले.
“किरण पावसकरला 94 साली पदावर घेतलं त्यावेळी बाळासाहेबांनी सही केली होती पत्रावर. 2008 ला निवडून आलो. 2010 ला मी MLC चा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांच्यामुळे राजीनामा दिला. अजित पवार यांचं अभिनंदन त्यांनी मला निवडून आणलं. तुमचे काळे धंदे लपविण्यासाठी बाळासाहेबांचा आधार घेऊ नका,” असे ते यावेळी म्हणाले.
संजय राऊत यांचं नाव घेऊन विचारतोय. मला का राजीनामा द्यावा लागला याच उत्तर द्या. हिंमत असेल तर असे पावसकर म्हणाले. कोव्हिडमध्ये पैसे खाल्लेली बाई माझ्यावर बोलणार. गांधींवर विश्वास आहे म्हणून राहुल गांधीचे पाय धुणार का? असा सवाल पावसकरांनी केला. 40 आमदार निघाले आज 60 झाले. उबाठाच्या लोकांना तुम्ही काय शिकवलं पैसे खायचे. गेले की पैशांसाठी गेले ?” असे म्हणत असल्याचे पावसकर म्हणाले.
खासदार प्रवेशावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असलेले किरण पावसकर म्हणाले, “एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत तुम्ही मला सांभाळलतं, आता दुसऱ्याला सांभाळा. त्यांना सांभाळलं की, मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणाघर आहे का? इकडे सांगितलं जातं की, शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, जे जे लोकं माझ्यासोबत आलेत, डॉ. श्रीकांत शिंदे त्यांची जबाबदारी ही तुमची आहे, तुम्ही माझ्यासोबत त्यांना सांभाळायचं आहे. हा दोन्ही पक्षांमधला फरक आहे.”






