Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेचा लाभ अचानक बंद का झाला? पात्र असूनही खात्यात पैसे न आल्याने महिलांचा संताप!

Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जानेवारी २०२६ पासूनचे हप्ते अचानक बंद झाल्याने राज्यातील महिलांमध्ये एवढा संताप का निर्माण झाला आहे?ई-केवायसी करूनही आणि प्रत्यक्षात चारचाकी वाहन नसतानाही पोर्टलवर अपात्र दाखवणाऱ्या तांत्रिक चुकीला जबाबदार कोण?

  • By anuradha sagar
Updated On: May 19, 2026 | 11:08 AM
Ladki Bahin Scheme 2026, Installment Not Received Problem

Ladki Bahin Scheme 2026, Installment Not Received Problem

Follow Us
Follow Us:
  • अनेक पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा झाला नाही
  • सोलापूर आणि जालना जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयांवर धडक मोर्चा
  • जानेवारी २०२६ पासून राज्यातील अर्ध्या कोटींपेक्षा अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नसल्याची माहिती
Ladki Bahin Yojna: राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्यांचे ३ हजार रुपये जमा झाले असले, तरी जानेवारी २०२६ पासून अनेक पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. “आम्ही पात्र असूनही लाभ बंद का झाला?” असा संतप्त सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांतून याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर येत आहेत. अनेक महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही खात्यात पैसे जमा झाले नसल्याची खंत व्यक्त केली आहे. काही महिलांच्या नावावर प्रत्यक्षात चारचाकी वाहन नसतानाही पोर्टलवर वाहनांची नोंद दिसत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थींनाही अपात्र ठरवले जात असल्याचा आरोप महिलांकडून केला जात आहे.

मुंबई महानगरपालिका पाणी कर वाढवणार? खर्चातील वाढीमुळे ६ ते ७ टक्के दरवाढीची शक्यता

सोलापूर आणि जालना जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयांवर धडक मोर्चा काढत थेट प्रशासनाला जाब विचारला. सोलापुरात तर दोन हजारांहून अधिक महिला कार्यालयात दाखल झाल्या होत्या. “ई-केवायसी केली, कागदपत्रे दुरुस्त केली, तरी पैसे का बंद झाले?” असा प्रश्न महिलांनी अधिकाऱ्यांना विचारला. अचानक वाढलेल्या तक्रारींमुळे अधिकारीही चांगलेच गोंधळले होते. त्याचवेळी परिसरातही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

जानेवारी २०२६ पासून राज्यातील अर्ध्या कोटींपेक्षा अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये केवळ सोलापूर जिल्ह्यातील सुमारे चार लाख महिलांचा समावेश आहे. काही महिलांना फेब्रुवारीपर्यंत हप्ते मिळाले, तर काहींना जानेवारीनंतर एकही हप्ता मिळालेला नाही.

लाँचिंगनंतर पुन्हा महागला हा OnePlus स्मार्टफोन! तब्बल 7 हजारांनी वाढली किंमत

योजनेत चारचाकी वाहन नसावे, ही महत्त्वाची अट आहे. मात्र अनेक महिलांकडे वाहन नसतानाही पोर्टलवर त्यांच्या नावावर वाहन दाखवले जात असल्याची तक्रार आहे. महिलांनी याबाबत आरटीओ कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या नावावर कोणतेही वाहन नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पोर्टलवरील चुकीच्या नोंदीमुळे लाभ बंद झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याशिवाय, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला असल्याचे दाखवणे, ई-केवायसीतील त्रुटी, वयाची चुकीची नोंद, तसेच कमी उत्पन्न असूनही आयकरदाते म्हणून नोंद झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये नाराजीचे वातावरण असून, सरकार या संदर्भात काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ladki bahin yojna 2026 installment not received problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • e-KYC
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Politics
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.