Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता गावागावांत नवे उद्योजक घडणार, MACCIA चा ऐतिहासिक निर्णय! काय आहे हब-अँड-स्पोक मॉडेल?

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर MACCIA च्या नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात एक ऐतिहासिक मोहीम उभारण्यात आली. 'गाव तिथे उद्योजक' या ऐतिहासिक अभियानाच्या शुभारंभावर करण्यात आला. यामुळे बिझनेस, स्टार्टअप आणि ग्रामीण अर्थव्यवस्था आणखीनच बळकट होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 05, 2026 | 03:08 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारी मोहीम!
  • MACCIAचा दिमाखदार पदग्रहण सोहळा संपन्न!
  • ३६ जिल्हे, ३६ हजार उद्योजक अन् दीड लाख रोजगार
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) च्या अध्यक्ष आणि नवनियुक्त कार्यकारिणी मंडळाचा (२०२६-२०२८) भव्य पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे ‘MACCIA’च्या वतीने ‘गाव तिथे उद्योजक’ (Gaon Tithe Udyojak) या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण अभियानाचा करण्यात आलेला अधिकृत शुभारंभ होय.

Adani Group चा मोठा निर्णय! कोलकात्यात 2,000 बेडचं सुपर हॉस्पिटल; 1,000 बेड गरीब रुग्णांसाठी राहणार कायम राखीव

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर , आमदार राजेंद्र पाटील येद्रावकार, आमदार सत्यजीत देशमुख, प्रमुख MACCI चे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र माणगावे, आणि MACCIA’ चे संपूर्ण कार्यकारिणी मंडळ उपस्थित होते.

प्रत्येक गावात किमान एक यशस्वी उद्योजक

अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील प्रत्येक गावात किमान एक यशस्वी उद्योजक घडवणे हा असून, ग्रामीण भागाचे रूपांतर व्यवसाय आणि प्रगतीच्या प्रमुख केंद्रांमध्ये करणे हे आहे. ‘MACCIA’ने ‘गाव तिथे उद्योजक इनक्युबेशन काउन्सिल’ च्या माध्यमातून २०२६ ते २०३१ या कालावधीत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ३६,००० ग्रामीण सूक्ष्म उद्योजक (RMEs) तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या ऐतिहासिक योजनेमुळे ग्रामीण भागात सुमारे १,४४,००० हून अधिक शाश्वत स्थानिक रोजगारांची निर्मिती होणार असून, अभियानाच्या तिसऱ्या वर्षापासून वार्षिक ३,६०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. यासोबतच ग्रामीण उद्योजकतेला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी ३०० सामाजिक उद्योजकांनाही प्रशिक्षित व स्थापित केले जाणार आहे.

हब-अँड-स्पोक मॉडेलचा वापर

महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये ग्रामीण भागाचे मोठे योगदान असले तरी अद्याप अनेक ग्रामीण कुटुंबांना शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध नाहीत. गावातील तरुण, महिला, शेतकरी आणि बचत गटांच्या सदस्यांमध्ये अफाट क्षमता असूनही त्यांना भांडवल, बाजारपेठ, योग्य मार्गदर्शन आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर, ‘MACCIA’ने या अभियानाची संकल्पना देशातील हरितक्रांती आणि धवलक्रांतीच्या धर्तीवर एक नवी ‘ग्राम उद्योग क्रांती’ घडवण्यासाठी तयार केली आहे. हे अभियान राबवण्यासाठी एका प्रगत हब-अँड-स्पोक मॉडेलचा वापर केला जाणार आहे, ज्यामध्ये जिल्हा आणि तालुका पातळीवर विशेष समुदाय प्रवेश केंद्रे सुरू केली जातील. पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या ५ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे अभियान सुरू केले जाईल, ज्यामध्ये ५,००० ग्रामीण सूक्ष्म उद्योजकांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे.

ग्रामीण महाराष्ट्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी चळवळ

‘MACCIA’चे नवनियुक्त अध्यक्ष श्री.रवींद्र माणगावे यांनी या मोहिमेचे महत्त्व आणि दूरदृष्टी विशद करताना सांगितले की, “आमचे व्हिजन महाराष्ट्रातील प्रत्येक गावाचा आर्थिक कायापालट करणे हे आहे. ‘गाव तिथे उद्योजक’ हे केवळ एक अभियान नसून ग्रामीण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवणारी एक मोठी चळवळ आहे. पहिल्या पिढीतील ग्रामीण तरुण आणि महिलांना केवळ नोकरी शोधणारे न ठेवता त्यांना नोकरी देणारे बनवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. या माध्यमातून आम्ही सरकार, वित्तीय संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्राला एकाच मंचावर आणून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उद्योग आणि रोजगाराची गंगा पोहोचवणार आहोत, ज्यामुळे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबण्यास मोठी मदत होईल.”

‘आत्मनिर्भर महाराष्ट्र’ खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात

या अभियानांतर्गत शेती आणि पूरक व्यवसाय, अन्न प्रक्रिया उद्योग, हस्तकला, लघु उद्योग आणि डिजिटल सेवा या क्षेत्रांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाईल. ग्रामीण सूक्ष्म उद्योजकांना व्यवसाय नियोजन, कर्ज पुरवठा, बाजारपेठेशी जोडणी, ब्रँडिंग, परवाने आणि तंत्रज्ञान दत्तक घेण्यासाठी ‘सिंगल-विंडो’ प्रणालीद्वारे सर्व प्रकारची मदत दिली जाणार आहे. ‘उद्योग विचार मंच’ च्या माध्यमातून गाव पातळीवर जनजागृती आणि क्षमता बांधणीचे कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामुळे तळागाळातील नवउद्योजकांना शोधणे सोपे होईल. हे अभियान यशस्वी करण्यासाठी ‘MACCIA’ने विविध कॉर्पोरेट्स, वित्तीय संस्था आणि तंत्रज्ञान भागीदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या सर्वंकष प्रयत्नांमुळे आगामी काळात ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येईल, असा विश्वास या सोहळ्यात व्यक्त करण्यात आला.

Aamir Khan Net Worth: आलीशान घर, लक्झरी कार अन्… तिसऱ्यांदा बोवल्यावर चढणारा मिस्टर परफेक्शनिस्ट किती श्रीमंत?

Web Title: New entrepreneurs emerge villages historic decision by maccia hub and spoke model

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Business News
  • CM Devendra Fadanvis
  • maharashtra
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News :युक्रेनच्या हल्ल्यांनी रशियाच्या तेल उद्योगाला मोठा धक्का; ५१% शुद्धीकरण क्षमता ठप्प
1

World News :युक्रेनच्या हल्ल्यांनी रशियाच्या तेल उद्योगाला मोठा धक्का; ५१% शुद्धीकरण क्षमता ठप्प

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन
2

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू
3

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू

Ishqa Ishqa Trailer:  प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज
4

Ishqa Ishqa Trailer: प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.