Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सरकार मनोज जरांगे समोर लाचार, झुंडशाहीला बळी पडले,’ लक्ष्मण हाकेचा राज्य सरकारवर निशाणा

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी यावर मोठे भाष्य करत हे सरकार जरांगेसमोर लाचार झालं असून कालचा निर्णय असंवैधानिक असल्याचे म्हंटले आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 06, 2026 | 07:02 PM
ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ओबीसी जनता पार्टी काढणार; प्रा. लक्ष्मण हाके यांची घोषणा

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ओबीसी जनता पार्टी काढणार; प्रा. लक्ष्मण हाके यांची घोषणा

Follow Us
Follow Us:
  • मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणेच सोयीसुविधा देण्याचा राज्य सरकार निर्णय
  • सरकार जरांगेसमोर लाचार झालं असून कालचा निर्णय असंवैधानिक – लक्ष्मण हाके
  • ओबीसी लोकांना सरकारने आतापर्यंत काय दिले आहे. त्याची श्वेतपत्रिका जाहीर करा – लक्ष्मण हाके
राज्य सरकारने काल (शुक्रवार, ५ जून) मोठा निर्णय घेत राज्यातील मराठा समाजासाठी महत्वाचे निर्णय घेतले. राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणेच सोयीसुविधा देण्याचा मोठा निर्णय काळ घेण्यात आला. तसेच मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या आंदोलकांच्या वारसदारांनाही आर्थिक मदत देण्याचे मान्य करण्यात आले. अश्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी यावर मोठे भाष्य करत हे सरकार जरांगेसमोर लाचार झालं असून कालचा निर्णय असंवैधानिक असल्याचे म्हंटले आहे.

लक्ष्मण हाके यांनी आज (शनिवार, ६ जून) पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाबाबत भाष्य केले. ते यावेळी म्हणाले, “काल राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत. त्यावर बरीच चर्चा सुरु आहे. ज्या योजना ओबीसींसाठी, त्याच योजना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी देण्याचा निर्णय झाला आहे. ज्या योजना ओबीसी समाजाला दिल्या आहेत. त्या अभ्यासपूर्ण आहेत. याच योजना मराठा समाजासाठी जाहीर करत आहेत. त्यामागचं लॉजिक आम्हाला कळलं नाही. मराठा समाज त्या नियमांत बसतो का? हि तर शासनाची वैचारिक दिवाळखोरी आहे.”

ते पुढे म्हणाले, “सर्व निकष बाजूला ठेवले आहेत का? अनेक महामंडळांना अपुरा निधी असताना, मराठा समाजाला एवढा निधी का दिला जात आहे? ओबीसी लोकांना सरकारने आतापर्यंत काय दिले आहे. त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी. अनेक प्रश्न सरकारवर उपस्थित होत आहेत. मागासवर्गीय लोकांना माणुसकी म्हणून पुढे येण्यासाठी सरकार काही योजना देणार आहे का? सरकार मूलभूत तत्वांना हरताळ फासत आहेत. कालचा निर्णय असंवैधानिक आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या योजना दिल्या, मग राज्यात आता राहिले कोण? मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना काही वेगळं मिळत असेल तर आमचा विरोध नाही मात्र हे देताना काय निकष लावले आहेत? कुठल्या तत्वावर तुम्ही हे दिले? कुठल्या समितीची शिफारस यासाठी होती? हे सरकार झुंडशाहीला बळी पडले आहे, हे सरकार मनोज जरांगे समोर लाचार झाले आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली.

विधान परिषद निवडणुकीवरून मविआ मध्येच वादंग! बाळासाहेब थोरात सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भडकले…

मराठा समाजाला मिळणार या आठ नव्या सवलती

  • शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती
दहावीनंतरच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ
शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती मराठा विद्यार्थ्यांनाही लागू
  • उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळणार
वाहन चालक व वाहक प्रशिक्षक
रोजगाराभिमुख प्रशिक्षणाला प्रोत्साहन
वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना सुरू होणार
  • कौशल्य विकासाद्वारे रोजगाराच्या नवीन संधी
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती
9 वी ते 12 वी विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना मदत
  • शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत
शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती
व्यावसायिक शिक्षणाचा खर्च कमी होणार
विविध अभ्यासक्रमांच्या शुल्काची प्रतिपूर्ती
  • विद्यार्थ्यांवरील आणि पालकांवरील आर्थिक भार कमी
परराज्यातील शिक्षणासाठी सवलत
परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लाभ
महाराष्ट्रातील मराठा विद्यार्थ्यांना बाहेरील राज्यांतील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मदत
  • अनुदानित व विनाअनुदानित संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्यांनाही फायदा
सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मराठा विद्यार्थी पात्र
सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पात्रता
मराठा विद्यार्थ्यांना व्यापक शैक्षणिक संधी
  • विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा
रिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्यांनाही लाभ
संस्थास्तरावरील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सवलती
CAP नंतरच्या रिक्त जागांवर प्रवेश घेतलेल्यांना लाभ
  • शैक्षणिक मदतीत समानतेचा दृष्टिकोन
भविष्यातील नवीन सवलतीही आपोआप लागू
ओबीसींसाठी जाहीर होणाऱ्या नव्या शैक्षणिक सुविधा मराठा समाजालाही मिळणार
स्वतंत्र आदेशाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही

‘शरद पवार गटाने दोनवेळा दगा दिला,’ पुणे विधानपरिषद निवडणूक माघारीवरून वसंत मोरे भडकले

Web Title: Lakshman hake slams maharashtra government over decision of maratha students will get obc students benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Laxman hake
  • Maharashtra Government
  • Maratha Arakshan
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार
1

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार

अनुसूचित जातींच्या उमेदवारांना मोठा दिलासा; MPSC मुलाखतीच्या तयारीसाठी BARTI कडून मिळणार 10 हजारांची मदत
2

अनुसूचित जातींच्या उमेदवारांना मोठा दिलासा; MPSC मुलाखतीच्या तयारीसाठी BARTI कडून मिळणार 10 हजारांची मदत

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
3

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
4

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.