Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Water Issue: माण-खटावमध्ये पाणी प्रश्न गंभीर! “नियोजित पाणी घोटाळा” झाल्याचा प्रशासनावर गंभीर आरोप

वडजल परिसरात कॅनॉलमधील पाणी बेकायदेशीररीत्या अडवून वळवले जात असल्याचे पुरावे समोर येत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने, “पाणी चोरीला प्रशासनाचे मूक संरक्षण मिळत आहे,

  • By anuradha sagar
Updated On: May 07, 2026 | 02:45 PM
Maan-Khatav Water News, Mahesh Karche, Water Scam Satara,

Maan-Khatav Water News, Mahesh Karche, Water Scam Satara,

Follow Us
Follow Us:
  • माण-खटाव तालुक्यातील पाणीवाटपाचा प्रश्न आता गंभीर
  • पूर्व भागातील ७ ते ८ गावांना एकदाही पाणी मिळाले नाही, तर वरच्या भागातील गावांना दोनदा आवर्तन दिल्याचा दावा
  • वडजल परिसरात कॅनॉलचे पाणी बेकायदेशीररीत्या अडवले जात असतानाही अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष.
Satara Water Issue: सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यातील पाणीवाटपाचा प्रश्न आता गंभीर राजकीय आणि प्रशासकीय संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या कारभारावर “संगनमत, भ्रष्टाचार आणि नियोजित पाणी घोटाळा” असे गंभीर आरोप होत आहेत. सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करत प्रशासनाला थेट अंतिम इशारा दिला आहे.

करचे यांच्या निनिवेदनानुसार, माण तालुक्याच्या पूर्व भागातील वळई, जांभुळणी, गंगोती, पुळकोटी, शिरताव, देवापूर, पळसावडे, बनगरवाडी या गावांना अद्याप एकदाही पाण्याचे आवर्तन मिळालेले नाही. याउलट वरच्या भागातील गावांना दोनदा पाणी देण्यात आल्याने, “हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून उघड भेदभाव आणि शेतकऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली आहे,” असा आरोप करण्यात आला आहे.

Satara Politics: ‘चार तालुक्यांचे चार मंत्री… बाकी सातारा अधांतरी?’ सातऱ्याच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या हालचाली

महेश करचे म्हणाले की, “पाणीवाटपातील ही तफावत ही साधी चूक नसून नियोजित पद्धतीने राबविलेला हा पाणी घोटाळा (Organized Water Scam) आहे. संबंधित अधिकारी आणि काही स्थानिक घटक यांचे संगनमत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुका आल्या की पाणी येते आणि निवडणुका संपल्या की तेच पाणी गायब होते. माण-खटावमध्ये वर्षानुवर्षे पाण्यावरून फक्त राजकारण केले जात आहे. पाणी ही सार्वजनिक संपत्ती असून शेतकऱ्यांचा तो मूलभूत हक्क आहे. मात्र, प्रशासन स्वतःलाच त्या पाण्याचा मालक समजू लागले आहे. आता माण-खटावची जनता हा अन्याय सहन करणार नाही.”

दरम्यान, वडजल परिसरात कॅनॉलमधील पाणी बेकायदेशीररीत्या अडवून वळवले जात असल्याचे पुरावे समोर येत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने, “पाणी चोरीला प्रशासनाचे मूक संरक्षण मिळत आहे,” असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

“निवडणुकांच्या काळात ठराविक भागाला पाणी सोडणे आणि प्रत्यक्ष दुष्काळाच्या तीव्र काळात त्याच भागाला पाण्यापासून वंचित ठेवणे, हा स्पष्ट राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासनाचा पक्षपातीपणा दर्शवतो. माणच्या उत्तर भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून शासनाला टँकरद्वारे कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागत आहे. तरीही ‘जिहे-कटापूर’ योजनेतून पाणी न सोडणे हे “जनतेच्या पैशाचा जाणीवपूर्वक अपव्यय” असल्याचे करचे यांनी नमूद केले

याप्रकरणी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंते व संबंधित अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ आणि महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ अंतर्गत तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

7/12 Uatara : ७/१२ उतारा बंद, आता मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’; शहरी भागातील रहिवाशांसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय

दरम्यान, १२ मे २०२६ पर्यंत समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा सुरू न झाल्यास आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास, १३ मे रोजी म्हसवड येथे शेतकऱ्यांसह उग्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार (Personal Liability) धरण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. माण-खटावमधील पाणीप्रश्नामुळे आता केवळ प्रशासनावरच नव्हे, तर राजकीय पातळीवरही मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

शेतकरी प्रतिक्रिया:

१) स्वाती अण्णासाहेब व्हरकाटे (माजी सरपंच, पळसावडे):

“पळसावडे गावाला आजपर्यंत तारळी योजनेचे एकदाही पाणी मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके जळून जात आहेत, जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आणि गावातील लोक अक्षरशः हतबल झाले आहेत. एकीकडे कॅनॉलमधून पाणी वाहते, पण आमच्या वाट्याला फक्त कोरडी आश्वासने येतात. प्रशासनाने आमच्या गावाला जाणीवपूर्वक वाळीत टाकले असून, हा केवळ अन्याय नसून आमच्या अस्तित्वावर घाला आहे.”

२) योगेश झिमल (शेतकरी, गंगोती):

“पाणी येणार या विश्वासावर आम्ही बँकांचे आणि सावकारांचे कर्ज काढून ढोबळी मिरची, टोमॅटो, भाजीपाला, डाळिंब अशा पिकांमध्ये लाखोंची गुंतवणूक केली. पण आता पाणीच मिळाले नाही तर आमच्या डोळ्यांसमोर संपूर्ण पिके जळून जात आहेत. जनावरांना पाणी नाही, घराघरांत चिंता आणि नैराश्य आहे. अधिकारी फक्त आश्वासने देतायत; पण शेतकरी रोज आर्थिकदृष्ट्या संपत चालला आहे. आम्हाला दया नको, आमच्या हक्काचे पाणी द्या… नाहीतर उद्या शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.”

 

Web Title: Maan khatav water issue mahesh karche water scam satara irrigation department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Farmer Protest
  • Satara Politics

संबंधित बातम्या

Satara District Bank Election: जावळीत राजकारण तापणार; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे-शिवेंद्रराजे आमनेसामने
1

Satara District Bank Election: जावळीत राजकारण तापणार; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे-शिवेंद्रराजे आमनेसामने

Sangli News: ‘शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊन…’; राजू शेट्टी, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
2

Sangli News: ‘शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊन…’; राजू शेट्टी, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Mhaswad Dam Destruction Dispute: माणगंगा नदीपात्रातील बंधारा तोडल्याचे प्रकरण तापले; ४ महिन्यांनंतरही पोलीस कारवाई शून्य
3

Mhaswad Dam Destruction Dispute: माणगंगा नदीपात्रातील बंधारा तोडल्याचे प्रकरण तापले; ४ महिन्यांनंतरही पोलीस कारवाई शून्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.