Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Band: मराठा आरक्षणामुळे राजकारण तापणार; उद्या ४ जिल्ह्यांत कडकडीत बंद!

Maharashtra Band: मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती पाहता सरकारने आजच तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. पण सरकारने तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलन आणखी तीव्र आणि आक्रमक करण्याचा इशाराही मराठा समाजाने दिला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 02, 2026 | 03:20 PM
Manoj Jarange Patil, Maratha Reservation, Maharashtra Bandh

Manoj Jarange Patil, Maratha Reservation, Maharashtra Bandh

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीतील उपोषणाचा आज ५ वा दिवस
  • प्रकृती खालावल्याने आणि तोडगा न निघाल्याने मराठा समाज प्रचंड आक्रमक
  • गुरुवारी (३ सप्टेंबर) जालना, बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्यांत बंदची हाक
Maratha Reservation: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत असल्याने मराठा समाजात संतापाची भावना तीव्र झाली आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (३ सप्टेंबर) जालना, बीड, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यांत कडकडीत बंदचे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या बंदला नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आंदोलकांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, तोडगा न निघाल्यास धाराशिव जिल्हाही बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?

अनेक जिल्ह्यांत रस्ता रोको

आज मराठा समाजाच्या वतीने राज्यातील विविध भागांत आंदोलन करण्यात आले. संभाजीनगर, परभणी, जालना, धाराशिव, बीड आणि लातूरसह अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको केला. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रशासन आणि पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

सरकारकडे आजच तोडगा काढण्याची मागणी

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती पाहता सरकारने आजच तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. पण सरकारने तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलन आणखी तीव्र आणि आक्रमक करण्याचा इशाराही मराठा समाजाने दिला आहे. त्यामुळे यापुढची आंदोलनाची रणनीती काय असणार आणि सरकार चर्चेतून कोणता तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

काय सुरू आणि काय बंद राहणार? काय बंद राहील:

दरम्यान, कालच्या हिंसक आंदोलनानंतर मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील सर्व बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मराठवाड्यातील अनेक व्यापारी संघटनांनी या बंदला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. पण यासोबतच मराठा कार्यकर्त्यांकडून प्रमुख महामार्ग आणि शहरांमधील वाहतूक रोखली जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट

काय सुरू राहणार (अत्यावश्यक सेवा) :

बंदच्या काळात बाजारपेठा बंद असल्या तरी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा आणि औषध दुकाने नियमित सुरू राहतील. यासोबतच शाळा महाविद्यालये, शैक्षणित संस्था देखील सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, दूध पुरवठा, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवाही सुरू राहणार आहेत.

काल नेमकं घडलं काय?

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यात अनेक ठिकाणी भागांत मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको, ठिय्या आणि उपोषण आंदोलन करण्यात आले. जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडीगोद्री फाट्यावर मराठा बांधवांनी आक्रमक रस्ता रोको केला. पुलावर ठिय्या मांडत आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. यावेळी गाडी सोडण्याच्या कारणावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.

लातूर शहर आणि जिल्ह्यातही मराठा समाजाचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. तसेच गुरुवारी पुकारण्यात आलेला लातूर बंद यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

भोकरमध्ये तरुणाचे चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन

नांदेड जिल्ह्यातील भोकर तहसील कार्यालयासमोरही जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. बालाजी पाटील कदम बटाळकर या मराठा तरुणाने मागील चार दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title: Maharashtra band news manoj jarange patil hunger strike maratha protest 5 day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Beed-Jalna Violence: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बीड-जालन्यात मध्यरात्री टायर जाळले
1

Beed-Jalna Violence: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बीड-जालन्यात मध्यरात्री टायर जाळले

Maratha Reservation: सोलापुरात जयकुमार गोरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; जरांगेंच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र
2

Maratha Reservation: सोलापुरात जयकुमार गोरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; जरांगेंच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात
3

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली
4

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.