Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed-Jalna Violence: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बीड-जालन्यात मध्यरात्री टायर जाळले

Maratha reservation: जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस उजाडला असताना बीडमध्येही मराठा बांधवांनी आंदोलन करत सरकारविरोधात संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणाही अलर्ट मोडवर आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 02, 2026 | 10:31 AM
Manoj Jarange Patil, Maratha Reservation, Jalna News,

Manoj Jarange Patil, Maratha Reservation, Jalna News,

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज ५ वा दिवस
  • प्रकृती खालावल्यामुळे बीड आणि जालन्यात मराठा समाज आक्रमक
  • जालना-जळगाव महामार्गावरील केदारखेडा येथे मध्यरात्री टायर जाळून निषेध
Maratha kranti Morcha Violence:  मराठा  आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले असून आज (2 सप्टेंबर) उपोषणाचा पाचवा दिवस आहे. पण वारंवार होणाऱ्या उपोषणामुळे यावेळी अवघ्या पाचव्या दिवशीच जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने आणि सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्या आरोप करत मराठा बांधवांनी बीड आणि जालना जिल्ह्यांत रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. काही ठिकाणी टायर जाळून निषेध करण्यात आल्याने दोन्ही जिल्ह्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जालन्यात मध्यरात्री टायर जाळून निषेध

मागील पाच दिवसांच्या उपोषणाने मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती खालावल्याचे कळताच मराठा समाज बांधव चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जालना-जळगाव महामार्गावरील केदारखेडा येथे मध्यरात्री आंदोलकांनी टायर जाळून सरकारचा निषेध केला. राज्य सरकार जाणीवपूर्वक जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सरकारने तातडीने आंदोलनाची दखल घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

बीडमध्येही आंदोलन; परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष

जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस उजाडला असताना बीडमध्येही मराठा बांधवांनी आंदोलन करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असतानाही सरकारकडून ठोस भूमिका जाहीर होत नसल्याने मराठा समाजात अस्वस्थता वाढत चालली आहे. आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेता बीड आणि जालना जिल्ह्यांतील परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत तसेच सरकारकडून आंदोलनाची दखल घेणार की नाही, याकडे आता मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक

मराठा  समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याचा आरोप करत मराठा बांधवांनी बीड आणि जालना जिल्ह्यांत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. काही ठिकाणी टायर जाळून निषेध करण्यात आल्याने दोन्ही जिल्ह्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बीडमध्येही आंदोलन; परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष

जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस उजाडला असताना बीडमध्येही मराठा बांधवांनी आंदोलन करत सरकारविरोधात संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणाही अलर्ट मोडवर आली आहे. तर जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली असतानाही. सरकारकडून ठोस भूमिका जाहीर होत नाही. हे पाहून मराठा समाजातील अस्वस्थता वाढत चालली आहे. आंदोलन वाढण्याची शक्यता लक्षात घेता बीड आणि जालना जिल्ह्यांतील परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत तसेच सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जाते की नाही, याकडे आता मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Manoj jarange patil health update maratha reservation protest in beed and jalna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • Beed News
  • jalna news
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Maratha Reservation: सोलापुरात जयकुमार गोरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; जरांगेंच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र
1

Maratha Reservation: सोलापुरात जयकुमार गोरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; जरांगेंच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात
2

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली
3

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात
4

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.