Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीतील उपोषणावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना UBT नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत महायुती सरकारला जरांगेंच्या उपोषणासाठी जबाबदार धरले आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 31, 2026 | 04:13 PM
‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात

‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात

Follow Us
Follow Us:
  • फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देणार नसल्याचा भास्कर जाधवांचा आरोप
  • जरांगेंच्या उपोषणासाठी महायुती सरकारला जबाबदार धरलं
  • उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगेंकडून मुंबईकडे जाण्याचे आवाहन
 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण देणार नाहीत, असा दावा भास्कर जाधव यांनी केला. सरकारकडून प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नेत्यांना किंवा मंत्र्यांना पुढे करून आश्वासने दिली जातात. मात्र, त्यानंतर दिलेला शब्द पूर्ण केला जात नाही, असा आरोपही त्यांनी केला. महायुती सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, हीच वस्तुस्थिती असल्याचे जाधव म्हणाले.

‘जरांगेंचा सरकारमधील नेत्यांवर विश्वास राहिला नाही’

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला महायुती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. सरकारमधील कोणत्याही नेत्यावर आता जरांगे पाटील यांचा विश्वास राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी आपण जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

Amit Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल

जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांच्यावर मराठाद्वेषाचा आरोप केला. प्रत्येकवेळी नवा शासन निर्णय काढून उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यानंतर विश्वासघात होतो, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे जरांगे पाटील उद्विग्न झाल्याचेही ते म्हणाले.

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलन तीव्र

दरम्यान, अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सरकारच्या अधिकृत शिष्टमंडळाकडून चर्चेसाठी पुढाकार घेण्याची प्रतीक्षा कायम आहे. अद्याप ठोस चर्चा न झाल्याने जरांगे यांनी मराठा समाजाला मुंबईकडे जाण्याचे आवाहन केले आहे.

मराठा समाजाने 12 तारखेपर्यंत मुंबईत पोहोचावे, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे जाण्याऐवजी स्वतंत्रपणे मुंबईकडे रवाना व्हावे, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली

Web Title: Maratha reservation bhaskar jadhav criticizes devendra fadnavis manoj jarange protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • Bhaskar Jadhav
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘मनोज जरांगे संघर्ष नव्हे तर टेंडर योद्धा, विखेंनी 5000 कोटींचे कंत्राट दिले’; अजय बारस्कर यांची टीका
1

‘मनोज जरांगे संघर्ष नव्हे तर टेंडर योद्धा, विखेंनी 5000 कोटींचे कंत्राट दिले’; अजय बारस्कर यांची टीका

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?
2

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.