Maharashtra Drought : महाराष्ट्र सरकारने राज्यातील एकूण ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये (जवळपास ७५ टक्के महाराष्ट्रात) अधिकृतपणे दुष्काळ घोषित केला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागांचे दौरे केल्यानंतर आणि विरोधकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Drought-Affected Takula List: राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी वाचा एका क्लिकवर
Follow Us:
Follow Us:
विस्तार
राज्यातील ३५८ पैकी तब्बल २६५ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने अधिकृतपणे दुष्काळाची घोषणा
कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागांतील बाधित तालुक्यांचा या दुष्काळग्रस्त यादीत समावेश
दुष्काळ जाहीर झाल्याने बाधित भागातील शेतकऱ्यांना सरकारी सवलती, कर्ज पुनर्गठन आणि दुष्काळी उपाययोजनांचा फायदा
Maharashtra Drought-Affected Takula List: राज्य सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा केली आहे. राज्यातील ३५८ पैकी २६५ जिल्ह्यात म्हणजेच जवळपास ७५ टक्के महाराष्ट्रात दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील दुष्काळाची परिस्थिती किती गंभीर आहे, याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यभरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती. या वाढत्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांचे काही प्रमुख नेतेमंडळीदेखील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. त्यानंतर विरोधकांकडून दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली जात होती. या सर्व घडामोडींनंतर आज सकाळी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला. महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर झाल्याने आता दुष्काळाच्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागांचा आढावा घेतल्यानंतर विविध जिल्ह्यांतील तालुक्यांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांमधील तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या या यादीत आपल्या तालुक्याचे नाव आहे की नाही हे शेतकऱ्यांना तपासता येणार आहे.
याशिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील माहूर आणि धर्माबाद या दोन तालुक्यांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील बसमत तालुक्याचाही समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Web Title: Maharashtra govt declares drought in 265 talukas check list