Yogesh Kumbhejkar on VB-G RAM G Scheme
जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा दालनात कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेत जिल्ह्यातील दुष्काळ देखरेख समितीची बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी सभागृहात तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व्हीसीद्वारे उपस्थित होते. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी व्हीबी जी रामजी योजनेतून जास्तीत जास्त कामे सुरू होणे आवश्यक आहेत.
त्यादृष्टीने आवश्यक प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून घ्यावी. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने कार्यवाही करावी. कामे शेल्फवर नाहीत म्हणून चालना मिळाली नाही, असे कुठेही घडता कामा नये. तसे घडल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिका-यांनी संबंधित यंत्रणांना दिला. कृषी, वन विभाग, मृद व जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा आदी विभागांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. अवैध उपसा रोखण्यासाठी दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत. ग्रामस्तरीय पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या, आपदा मित्र, जलसुरक्षक आणि स्वयंसेवकांना जलस्रोतांवर नियमित देखरेख व गस्त घालण्यासाठी प्रोत्साहित करावे. पाणीबचतीविषयी व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. (Washim)
विशेषतः शिक्षण विभागाने शासकीय व खासगी शाळांच्या माध्यमातून जलदूत नेमावेत. विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरातील पाणी उपलब्धता, वापर असे वॉटर ऑडिट करण्याचे प्रोत्साहन द्यावे जेणेकडून पाणी बचतीचा – संदेश सर्वदूर पोहोचेल, असे निर्देश जिल्हाधिकाायांनी दिले. चारा लागवडीच्या अनुषंगाने बियाणे वाटपाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे. जलसंधारणाची कामे व चारा लागवडीला अधिकाधिक प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी सांगितले. जलाशयांतील पाणी उपलब्धता, वीजपुरवठा, सार्वजनिक वितरण प्रणाली आदी विविध बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.






