Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics:अजित पवारांच्या पक्षापेक्षा थेट भाजप…! शरद पवारांची राष्ट्रवादी NDA च्या दिशेने? पडद्यामागे मोठ्या हालचाली

Meta Description: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांना वेग. आमदारांच्या बैठकीनंतर जयंत पाटील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 14, 2026 | 11:52 AM
Sharad Pawar, Jayant Patil, NCP SP, BJP, NDA Alliance, Maharashtra Politics

Sharad Pawar, Jayant Patil, NCP SP, BJP, NDA Alliance, Maharashtra Politics

Follow Us
Follow Us:
  • शरद पवारांच्याच राष्ट्रवादीत महायुतीत सामील होण्याच्या हालचाली
  • जयंत पाटलांची आमदारांशी चर्चा
  • अंतिम निर्णय शरद पवार घेणार
Sharad Pawar NCP Merge NDA : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट भाजप प्रणित महायुतीमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांनी आता जोर धरल्याचे दिसत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेसंबंधी आमदार आणि खासदार यांची मते जाणून घेत असल्याचेही बोलले जात आहे.

एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान, शरद पवार यांनी विधान भवनात आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीला त्यांच्या गटाचे १० पैकी ९ आमदार उपस्थित होते. या बैठकीत जयंत पाटील यांनी प्रत्येक आमदाराशी चर्चा करून एनडीए सोबत जायचे की नाही, याबाबक त्यांची भूमिका जाणून घेतल्याचे सांगितले जाते.

मोठी बातमी ! फडणवीसांच्या ‘वर्षा’वर भाजप कोअर कमिटीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा ?

अनेक आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसध्ये जाण्यापेक्षा थेट भाजपमध्ये सामील होणे अधिक योग्य आहे, असा पर्याय सुचवला आहे. मतदार संघातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणे आणि २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय ताकद वाढवण्यासाठी एनडीएसोबत जाणे अधिक योग्य असल्याचे काही आमदारांनी म्हटले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत विविध राजकीय पर्यायांवर चर्चा झाली. या बैठकीत उपस्थित असलेल्या तीन आमदारांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर चर्चेची माहिती दिल्याचा दावा संबंधित वृत्तात करण्यात आला आहे. मात्र, या वृत्ताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या सर्व घडामोडींनंतर, “आता अंतिम निर्णय शरद पवार घेतील आणि तो लवकरच कळवण्यात येईल,” असे जयंत पाटील यांनी आमदारांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे एनडीएसोबत जाण्याबाबत शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘पक्षात काही अतृप्त आत्मे, त्यांना पक्ष चांगला चाललेलं खूपत नाही,’ सुनेत्रा पवार यांच्यावरील नोटिशीवर राष्ट्रवादीचा पलटवार

रोहित पवार बैठकीला अनुपस्थित

लक्षणीय बाब म्हणजे नऊ आमदारांच्या बैठकीला आमदार रोहित पवार मात्र उपस्थित नव्हते. भाजपसोबत जाण्याच्या पर्यायाला त्यांचा तीव्र विरोध असल्याचे सांगितले जाते. बैठकीनंतर रोहित पवार यांनीही आमदारांशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांच्या भूमिका जाणून घेतल्याची माहिती आहे.

लवकरच आमदार-खासदारांची बैठक?

सूत्रांच्या माहितीनुसार, आता शरद पवार स्वतः पक्षाच्या आमदार आणि खासदारांची स्वतंत्र बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Web Title: Maharashtra politics sharad pawar ncp sp joining nda jayant patil mlas secret meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • jayant patil
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह? ज्येष्ठ नेत्याची कायदेशीर नोटीस
1

सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह? ज्येष्ठ नेत्याची कायदेशीर नोटीस

‘आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी’; पक्षांतराच्या अफवांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2

‘आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी’; पक्षांतराच्या अफवांवर सुप्रिया सुळे संतापल्या

‘ज्यांच्या पोटात दुखत असेल असेल त्यांच्यासाठी ठाण्यात..,’ शरद पवार यांच्या भेटीवरून एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार
3

‘ज्यांच्या पोटात दुखत असेल असेल त्यांच्यासाठी ठाण्यात..,’ शरद पवार यांच्या भेटीवरून एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार

‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल
4

‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.