Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुती पालिका निवडणुका एकत्रच लढणार, पण…; खासदार सुनील तटकरे यांची भूमिका

आम्ही महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवण्याचा विचार करत आहोत. पुढील तीन दिवसांत तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल. महायुती समन्वय समितीची बैठक पुढील मंगळवारी होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 06, 2025 | 09:18 AM
अजित पवारांच्या विमान अपघातावर सुनील तटकरेंचे मोठं विधान; म्हणाले, 'CBI चौकशीतून...'

अजित पवारांच्या विमान अपघातावर सुनील तटकरेंचे मोठं विधान; म्हणाले, 'CBI चौकशीतून...'

Follow Us
Follow Us:

मुंबई : नगरपरिषद, नगरपंचायत यांसारख्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी तळागाळातील कार्यकर्ते तयार आहेत. ‘आम्ही महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवण्याचा विचार करत आहोत’, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

सुनील तटकरे यांनी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. तटकरे म्हणाले, ‘आम्ही महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवण्याचा विचार करत आहोत. पुढील तीन दिवसांत तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल. महायुती समन्वय समितीची बैठक पुढील मंगळवारी होणार आहे. या बैठकीत महायुती म्हणून नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुका लढवण्याच्या शक्यतेवर चर्चा करण्यात येईल. राष्ट्रवादीने प्रत्येक जिल्ह्यातून अर्ज मागवले आहेत. अर्जाची संख्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र उत्साह दर्शवते’.

तसेच रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेने (उबाठा) ची युती होणार असल्याच्या अटकळामुळे महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचा असा विश्वास आहे की, अशी युती अनावश्यक आहे. परंतु, राष्ट्रवादी ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. तटकरे यांनी सावध भूमिका घेत सांगितले की, युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची निवडणूक आयोगावर टीका

भाजप निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सरकारच चोरत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एक बॉम्ब टाकून भाजप व निवडणूक आयोग लोकशाहीचा खून कसा करत आहेत, हे देशाला दाखवून दिले. हरियाणात मतचोरी कशी केली याचे पुरावे देऊन निवडणूक आयोगाला उघडे पाडले. पण ‘निर्लज्जम सदा सुखी’ या उक्तीप्रमाणे निवडणूक आयोगाच्या कामात काहीच सुधारणा होत नाही. निवडणूक आयोग सरकारच्या हातातली कठपुतली बनले आहे, असे आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

Web Title: Mahayuti will contest the municipal elections together says mp sunil tatkare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
2

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर
3

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.