Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mamata Banerjee: “आम्ही हारलो नाही, लोकशाहीची हत्या झाली!” ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार; निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Mamata Banerjee News: पश्चिम बंगालमध्ये पराभव पत्करण्यास ममता बॅनर्जींचा नकार. निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप करत राजीनामा न देण्याची घोषणा. वाचा सविस्तर बातमी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 05, 2026 | 05:31 PM
ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार; निवडणूक आयोगावर गंभीर आरोप (Photo Credit- X)

ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार; निवडणूक आयोगावर गंभीर आरोप (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • “आम्ही हारलो नाही, लोकशाहीची हत्या झाली!”
  • ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार
  • निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
Mamata Banerjee News: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आम्ही ही निवडणूक हरलेलो नाही, तर १०० जागांवर मतांची लूट करण्यात आली आहे,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. ही निवडणूक केवळ भाजपविरुद्ध नसून निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणांविरुद्धही होती, असे सांगत त्यांनी सध्याच्या परिस्थितीत राजभवन येथे जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप

निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, निवडणूक आयोगाचा दृष्टिकोन पूर्णपणे भाजपधार्जिणा होता. “देशात लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे. मी रस्त्यावर होते आणि यापुढेही जनतेसाठी रस्त्यावरच उतरून संघर्ष करत राहीन. राजीनामा देण्यासाठी मी राजभवनात का जावे? मला जर शपथ घ्यायची असती तर मी गेले असते, पण त्यांनी सर्व यंत्रणेवर कब्जा केला आहे,” अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. निवडणुकीच्या काळात झालेल्या प्रशासकीय बदलांवर त्यांनी बोट ठेवले. “दोन टप्प्यातील मतदानानंतर आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यास सुरुवात झाली आणि निष्पक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यांनी स्वतःच्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आणि EVM मशीनबाबतही संशयास्पद हालचाली झाल्या,” असा दावा बॅनर्जी यांनी केला.

#WATCH | Kolkata: Outgoing West Bengal CM Mamata Banerjee says, “Sonia ji, Rahul Gandhi, Arvind Kejriwal, Uddhav Thackeray, Akhilesh Yadav, Tejashwi Yadav, Hemant Soren rang me up. All the allies of INDIA Alliance told me that they are totally and absolutely with me. I think our… pic.twitter.com/W8ZRWMP1d2 — ANI (@ANI) May 5, 2026

‘इंडिया’ (INDIA) आघाडीचा खंबीर पाठिंबा

या कठीण प्रसंगात संपूर्ण ‘इंडिया’ आघाडी त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे ममता बॅनर्जींनी सांगितले. “मी माझ्या राजकीय कारकिर्दीत असा जुलूम कधीच पाहिला नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन यांसारख्या नेत्यांनी माझ्याशी संवाद साधून पाठिंबा दर्शवला आहे. अखिलेश यादव देखील भेटीसाठी येत आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.

Who is Next CM of West Bengal; भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी ५ दिग्गज शर्यतीत !

“मोजणी केंद्रांचे हायजॅकिंग आणि अत्याचाराचा कळस”

मतमोजणीच्या दिवशी झालेल्या प्रकारावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, “मोजणी केंद्रांचे हायजॅकिंग करण्यात आले असून कालचा दिवस लोकशाहीच्या इतिहासातील ‘काळा इतिहास’ म्हणून ओळखला जाईल. मला स्वतःला एका महिलेला मतदान केंद्रावरून धक्के मारून बाहेर काढण्यात आले, तर सर्वसामान्यांची काय अवस्था झाली असेल? त्यांनी आमची कार्यालये ताब्यात घेतली असून कार्यकर्त्यांवर अत्याचार सुरू केले आहेत”.

आगामी रणनीती: १० सदस्यीय समितीची स्थापना

या अन्यायाविरुद्ध कायदेशीर आणि राजकीय लढा देण्यासाठी तृणमूल काँग्रेसने १० सदस्यीय ‘फॅक्ट फाइंडिंग कमिटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती विविध भागांचा दौरा करून सत्य परिस्थिती समोर आणेल. “जर त्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक जिंकली असती, तर मी काहीच बोलले नसते. पण हा विजय जबरदस्तीने मिळवलेला आहे. आम्ही पुन्हा जोमाने फिनिक्स भरारी घेऊ,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारला केवळ एकाच पक्षाची सत्ता देशात हवी असून, यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या लोकशाहीबद्दल चुकीचा संदेश जात असल्याची टीकाही त्यांनी शेवटी केली.

West Bengal Assembly Election Results 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाची इनसाईड स्टोरी

Web Title: Mamata banerjee refuses to resign alleged vote looting west bengal elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Latest Political News
  • Mamata Banerjee
  • West Bengal Election Result 2026

संबंधित बातम्या

West Bengal Politics: बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ; अखेर राज्यपालांकडून ममता बॅनर्जींचे मंत्रिमंडळ बरखास्त
1

West Bengal Politics: बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ; अखेर राज्यपालांकडून ममता बॅनर्जींचे मंत्रिमंडळ बरखास्त

Sanjay Raut: पश्चिम बंगाल निकालावर संजय राऊतांचा मोठा दावा; “हा ममता बॅनर्जींचा नाही, लोकशाहीचा पराभव”
2

Sanjay Raut: पश्चिम बंगाल निकालावर संजय राऊतांचा मोठा दावा; “हा ममता बॅनर्जींचा नाही, लोकशाहीचा पराभव”

‘ममतांसारखीच परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या पक्षाची होईल’; राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांची टीका
3

‘ममतांसारखीच परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या पक्षाची होईल’; राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांची टीका

Bengal Violence News : निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका; टीएमसी कार्यालयाला आग, तर कोलकाता मार्केटमध्ये तोडफोड
4

Bengal Violence News : निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका; टीएमसी कार्यालयाला आग, तर कोलकाता मार्केटमध्ये तोडफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.