Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange PC: मी एकटाच मुंबईला जाणार, फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकणार: जरांगे पाटलांचा मोठा निर्णय

Manoj Jarange Patil News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी १५ तारखेला मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार केला असून, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्विकाराचे आवाहन केल्यानंतरही जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 14, 2026 | 01:39 PM
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Follow Us
Follow Us:

 

  • मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे केवळ १० सहकाऱ्यांसह आणि २ गाड्यांतून १५ तारखेला मुंबईला जाण्याची घोषणा
  • आंदोलनात घुसखोरी करून दंगल घडवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप
  • सध्या कोणीही मुंबईकडे निघू नये, परंतु योग्य वेळी हाक दिल्यानंतर येण्यासाठी गाड्या तयार ठेवा
Maratha Reservation  Mumbai Agitation: राज्यात गणेशोत्सवाची सुरुवात होत असून दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाऊन उपोषण करण्याची घोषणा केली आहे. पण मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील जरांगे पाटलांना यावर पुर्नर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. या घडामोडीनंतर आता मनोज जरांगे यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. मी एकटाच मुंबईला जाणार, कशी परवानगी नाकारतात ते बघूच, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पण त्याच वेळी त्यांनी मराठा समाजालाही मुंबईत न येण्याचे आवाहन केलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे जरांगे पाटलांनी या आंदोलनासंदर्भात गंभीर आरोपही केला आहे. “मराठा समाजाच्या आंदोलनात लोकांना घुसवून दंगल घडवण्याचा कट होता. असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकारने देवदेवतांच्या आडून वार केला. आता आपणही डाव टाकायचं मराठ्यांनो, मी तुम्हाला योग्य वेली मुंबईत बोलवेन, १५ तारखेला मी एकटाच जातो. सोबत फक्त दोन गाड्या आणि १० लोक असतील, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Maratha Reservation आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार;

कोण आझाद मैदानात परवानगी देत नाही तेच बघतो

मी आता निघतो, कसे अडवतात, ते बघूच. कोण आझाद मैदानात परवानगी देत नाही तेच बघतो, मराठ्यांची गर्दी होणार म्हणून त्यांनी परवानगी नाकारली. आता मी एकटाच जातो. उद्या सकाळी आंतरवाली सराटीतून मुंबईला जायला निघणार आहे, इतरांनी येऊ नका, फक्त गाड्या तयार ठेवा, योग्य वेळी मी तुम्हाला बोलावेन, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

 

मी ज्या मार्गाने जायचं ठरवलं होत त्याच मार्गाने जाणार

मी ज्या मार्गाने जायचं ठरवलं होत त्याच मार्गाने जाणार, जिथं मुक्काम ठरला होता, तिथे मुक्काम करणार, त्यात फक्त जेवणासाठी जे साहित्य आणलय ते तयार केलं तर ते वाया जाणार नाही, तुम्ही सध्या काही करू नका, ते नंतर कामाला येईल, ज्या ठिकाणी मुक्काम ठरलेत तिथेच मुक्काम होतील, फक्त लाखो लोकांसाठी होणारा खर्च वाचला, आता मी एकटा जाणार आहे. पैसे वाया घालवायचे नाही, वाचलेले पैसे आणि साहित्य मुंबईत समाजाच्या कामाला येतील, असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

Mumbai News: ‘आयटी’तील २०० कोटींच्या गैरव्यवहारावर पांघरुण? चौकशी सुरू करताच दक्षताप्रमुखांची गच्छंती

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १६ वा दिवस असून त्यांनी सलाईन आणि पाणीदेखील बंद केलं आहे. त्यांची प्रकृती वेगाने खालावत चालली आहे. सध्या सलाईनच्या जिवावर जगतोय, तुमच्याशी बोलतोय, कधीही काहीही होऊ शकतं, त्रास जाणवू लागला आहे, असही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Manoj jarange patil mumbai march alone alleges riot conspiracy maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

Maratha Reservation: मुंबईत जाऊन मरेन, शरण येणार नाही! Manoj Janrange यांचा निर्धार
1

Maratha Reservation: मुंबईत जाऊन मरेन, शरण येणार नाही! Manoj Janrange यांचा निर्धार

Manoj Jarange Patil : ‘बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत,’ जरांगे पाटलांची बावनकुळेंवर सडकून टीका
2

Manoj Jarange Patil : ‘बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत,’ जरांगे पाटलांची बावनकुळेंवर सडकून टीका

Maratha Reservation आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; ‘तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही,’ परवानगी नाकारताच संतापले जरांगे पाटील
3

Maratha Reservation आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; ‘तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही,’ परवानगी नाकारताच संतापले जरांगे पाटील

Maratha Reservation : मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
4

Maratha Reservation : मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.