Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange: ‘कुणाच्याही दबावाला बळी पडू नका…,’ मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या तयारीत; २९ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे. २० ते २५ ऑगस्टदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २९ ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा सरकारला दिला. ‘आम्ही कोणत्याही लेकीबाळींविरोधात बोललो नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 17, 2026 | 11:36 AM
Manoj Jarange Patil, Manoj Jarange Mumbai Morcha, Azad Maidan Protest,

Manoj Jarange Patil, Manoj Jarange Mumbai Morcha, Azad Maidan Protest,

Follow Us
Follow Us:
  • २० ते २५ ऑगस्ट विदर्भ-मराठवाडा दौरा
  • २९ ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाचा मनोज जरांगे पाटलांचा इशारा
  • मनोज जरांगे पाटलांचा कार्यकर्त्यांना संदेश
Manoj Jarange: जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवली सराटीमध्ये अभ्यासकांसोबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी सरकारसमोर यापूर्वी मांडण्यात आलेल्या मागण्या, त्यासंदर्भातील कायदेशीर बाबी तसेच सरकारने जारी केलेल्या एसओपीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत आगामी आंदोलनाची दिशा काय असावी, सरकारसमोर कोणते मुद्दे प्रभावीपणे मांडता येतील आणि यापूर्वी काढण्यात आलेल्या शासन निर्णयांमध्ये कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, यावरही चर्चा करण्यात आली.

यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनाची भूमिका कायम ठेवणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. २० ते २५ ऑगस्टदरम्यान विदर्भ आणि मराठवाडा दौरा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यात विविध ठिकाणी मराठा समाजाशी संवाद साधून आंदोलनाची पुढील दिशा आणि भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे सांगत सरकारवर दबाव वाढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ऑगस्टच्या अखेरीस मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेबाबतही स्पष्टीकरण दिले. ‘आम्ही कोणत्याही लेकीबाळींविरोधात बोललो नाही,’ असे ते म्हणाले. तसेच कार्यकर्त्यांना कोणत्याही दबावाला बळी न पडण्याचे आवाहन करत ‘कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, आक्रमक व्हा,’ असा संदेश दिला.

दरम्यान, २० ते २५ ऑगस्टदरम्यान होणारा विदर्भ-मराठवाडा दौरा आणि त्यानंतर २९ ऑगस्टपासून प्रस्तावित उपोषण यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. सरकारकडून या भूमिकेवर काय प्रतिक्रिया दिली जाते आणि आगामी काळात आंदोलनाची नेमकी दिशा काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

‘जीव गेला तरी चालेल, पण आंदोलनावर ठाम’

२९ ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका व्यक्त केली. ‘जीव गेला तरी चालेल, पण आंदोलनावर ठाम राहणार,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अभ्यासकांसोबत चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारकडून आतापर्यंत घेण्यात आलेल्या निर्णयांचा आणि शासन निर्णयांचा अभ्यास करून पुढील भूमिका ठरवण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

सरकारच्या जीआरमध्ये चुका असल्याचा दावा

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने काढलेल्या जीआरमध्ये काही चुका असल्याचा दावा करत त्या चुका सरकारने मान्य करून त्यामध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी केली. विशेषतः मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने शासन निर्णय अधिक स्पष्ट आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य पद्धतीने कसे करता येतील, याबाबत अभ्यासकांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, बैठकीत त्यांनी अभ्यासकांसमोर तीन प्रमुख प्रश्न ठेवले. सरकारने आतापर्यंत काढलेल्या जीआरमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत, भविष्यात काढण्यात येणारे जीआर कोणत्या पद्धतीने असावेत आणि ओबीसी सवलतीच्या मुद्द्यावर नेमकी कायदेशीर भूमिका काय असावी, या बाबींवर चर्चा करण्यात आली.

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

Web Title: Manoj jarange patil vidarbha marathwada tour august 20 to 25 fast from august 29

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • maharashtra
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन
1

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला
2

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

बुलेट ट्रेनसाठी भिवंडीत महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल तयार; ५४ हजारांहून अधिक बोल्टचा वापर
3

बुलेट ट्रेनसाठी भिवंडीत महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल तयार; ५४ हजारांहून अधिक बोल्टचा वापर

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’
4

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.