Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhananjay Munde Resignation : “हा माजोरडा…एक दिवस याची लंका नक्की डुबणार…; मनोज जरांगे पाटलांनी मुंडेंवर तोफ डागली

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर प्रतिक्रिया दिली असून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 04, 2025 | 02:44 PM
maratha leader manoj jarange patil reaction on Dhananjay Munde resignation

maratha leader manoj jarange patil reaction on Dhananjay Munde resignation

Follow Us
Close
Follow Us:

जालना : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त केल्यानंतर मुंडेंनी अखेर राजीनामा दिला आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी म्हणून आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचे आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बीड हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. संपूर्ण राज्यभरामध्ये आक्रोश मोर्चा काढून जरांगे पाटील यांनी देशमुख कुटुंबियांसाठी आवाज उठवला होता. आता अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून  “जे झालं चांगलं झालं. अजित पवार आणि फडणवीस यांची नियत महत्त्वाची आहे. एवढी मोठी घटना होऊन मग्रुरी जशीच्या तशी आहे असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

माध्यमांशी संवाद साधताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एवढी मोठी घटना होऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मग्रुरी जशीच्या तशी आहे. एवढी मोठी घटना झाल्यावर त्यांना पश्चात्ताप होणार नाही. असं करून हे सर्वांच्या नजरेतून उतरणार आहे. एक दिवस यांची लंका डुबणार. यांची मग्रुरी आणि मस्तीखोरामुळे यांची लंका पाण्यात डुबणार. हे लयाला जाणार आणि पाताळात जाणार आहे” असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “आता सरकारवरील नामुष्की ओढवली, मी या स्वरूपाचा असा राजीनामा देतो. तसं बोलत नाही तो. आताही तीच मग्रुरीची भाषा आहे. माझं दुखतंय मी राजीनामा देतोय, उपचारासाठी. पदाचा आणि उपचाराचा काय संबंध? बरं झालं. मुख्यमंत्री आणि अजितदादांना कळालं माजोरडा आहे म्हणून. महाराष्ट्रातील मराठ्यांनाही कळायला हवं होतं. मराठ्यांनी सावध राहून त्यांना मोठं करू नये. मराठ्यांनी हातचं राखून काम केलं पाहिजे. या टोळीचा लोक नायनाट करतात.”

धनंजय मुंडे 302 मध्ये आहे

“सर्व चार्जशीट झाल्यावर राजीनामा दिला. त्या आधी द्यायला हवा होता. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं आहे. राजकीय गुंड मित्र वाचवण्याचं काम केलं. उशिरा का असेना पण अजितदादा आणि फडणवीस यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी लाथ घालून हाकललं. आपण मागणी केली. त्यांनी नैतिकता म्हणा आणि संस्कार म्हणा, आम्ही काल मागणी केली आज राजीनामा दिला. हे माज मस्ती करून आपलेच लोकं पाताळात घालणार. लोक त्यांना राहू देणार नाही. यांचा माजोरडापणा राहणार नाही. हे पैसेवाले झाल्यावर मस्तीखोर झाले. यांची अर्धी टोळी आत गेली. धनंजय मुंडे 302 मध्ये आहे म्हणजे आहे,” असा घणाघात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी  क्लिक करा

पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “मी फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे मागणी करतो की पुरवणी तपास करा. पुरवणी तपासात सर्वांना सहआरोपी करा. धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा. दोन ते तीन महिन्यात प्रकरण संपवा. या सर्वांना फाशी द्या. “आरोपी जो सरमाडे आहे. त्याने कबुल करावे की मी धनंजय मुंडेसाठी खंडणी मागितली आणि पाप केलं. त्याच्या कुटुंबानेही ते सांगावं. आतापर्यंत जेवढे खून केले ते मुंडेसाठीच केले. एक नंबरच्या आरोपीला सांगणं आहे, डोक्यावर पाप घेऊन फिरू नका. हा मजेत फिरेल. भाषणं करेल. त्याच्यासाठी केलं त्याचं नाव घ्या,” असा गंभीर आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Web Title: Manoj jarange patils criticism on dhananjay munde resignation political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • Beed Murder Case
  • Dhnanjay Munde
  • Manoj Jarange

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मराठा आंदोलनाआधी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; OBC समाजामध्ये 29 जातींचा समावेश होणार?
1

मोठी बातमी! मराठा आंदोलनाआधी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; OBC समाजामध्ये 29 जातींचा समावेश होणार?

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
2

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…
3

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
4

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.