धनंजय मुंडे यांच्या राजीनामावर भाजप आमदार सुरेश धस प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये मोठी घटना घडली आहे. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. बीड हत्या प्रकरणामुळे त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात होती. विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची लाखोली वाहिली होती. यामध्ये भाजप नेते व आमदार सुरेश धस हे अग्रेसर होते. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मिक कराड यांच्यामध्ये संबंध असल्याचा आरोप अन् पुरावे दिले होते. अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज (दि.04) अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. मात्र कामकाज सुरु होण्यापूर्वीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावर आता आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार सुरेश धस म्हणाले की, “देवाची काठी लागत नाही, परंतु न्याय मिळतो. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेतली. आज तो न्याय दिसला,” अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी राजीनाम्याचे स्वागत केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्या सावरगाव येथील सभेतील त्या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यात वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पान सुद्धा हलत नाही, अशा त्या म्हणाल्या होत्या. तोच धागा पकडून धसांनी संतोष देशमुखांच्या हत्येचं पान मुंडेशिवाय परस्पर कसं हललं?” असा सवाल करत मुंडे यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभं केले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. तसेच अर्थिक घोटाळे, गुन्हेगारी संबंध अशा अनेक मुद्द्यांवर सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्यामुळे धस वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. आता धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, “धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं कृत्य केलं आहे. त्यांचे महाराष्ट्रावर किती उपकार झाले आहेत. मात्र यांची हकालपट्टी करण्याची ताकद या सरकारमध्ये नाही. यांना बडतर्फ करायला हवं होतं. त्यांना राजकारणातून काढून टाकलं पाहिजे होतं,” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.