Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : जरांगे मुंबईत धडकणार, सरकारची भूमिका स्पष्ट; प्रवीण दरेकर म्हणाले, ‘सरकार चर्चेसाठी तयार’

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे 19 सप्टेंबरपासून आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत. त्यांच्या मुंबई आंदोलनावर महायुतीचे नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली असून चर्चेची तयारी असल्याचं सांगितलं आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 12, 2026 | 05:15 PM
जरांगे मुंबईत धडकणार, सरकारची भूमिका स्पष्ट

जरांगे मुंबईत धडकणार, सरकारची भूमिका स्पष्ट

Follow Us
Follow Us:
  • 15 सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून निघणार, 19 सप्टेंबरपासून मुंबईत उपोषण
  • 14 पैकी 12 मागण्या पूर्ण झाल्याचा प्रवीण दरेकरांचा दावा
  • गणेशोत्सवाला गालबोट लागू नये, शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन
 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे 15 सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोलीमार्गे आझाद मैदान गाठणार आहेत. त्यांच्या या निर्णयावर महायुतीकडून पहिली प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाच्या मागण्या गंभीर असल्याचं मान्य केलं. मराठा समाज मोठा असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने आतापर्यंत पूर्ण सहकार्य केलं आहे. सरकारकडून चर्चा करण्यात आली असून अनेक मंत्री आणि नेते प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन जरांगेंशी चर्चा करून आले आहेत, असं दरेकर म्हणाले.

‘14 पैकी 12 मागण्या पूर्ण’

मराठा समाजाच्या 14 मागण्यांपैकी 12 मागण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित एक-दोन मागण्या कायद्याच्या चौकटीत अडकलेल्या आहेत. त्यातूनही मार्ग काढण्यासाठी सरकारचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे, असा दावा दरेकर यांनी केला. सरकारने आतापर्यंत जे शक्य आहे ते केलं असून पुढेही चर्चेची दारं खुली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Maratha Reservation Update: ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलन तापणार! जरांगे पाटलांकडून मुंबई आंदोलनाची घोषणा

देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी जेवढं काम केलं, तेवढं यापूर्वी कोणत्याही सरकारच्या काळात झालं नसल्याचंही दरेकर म्हणाले. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि सरकारमधील इतर नेतेही मराठा समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘तुम्हाला दौरे हवेत की प्रश्न सुटायला हवेत?’

जरांगे यांच्या आंदोलनस्थळी कोण नेता आला किंवा कोण आला नाही, यापेक्षा प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे, असं दरेकरांनी ठणकावून सांगितलं. राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्यासह अनेक नेते जरांगेंना भेटले आहेत. त्यामुळे सरकारने दखल घेतली नाही, असं म्हणता येणार नाही, असा त्यांचा दावा आहे.

मुंबईत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि लोकशाहीत शांततामय आंदोलन करता येतं. मात्र गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे आंदोलनामुळे गणेशोत्सवाला किंवा कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं दरेकर म्हणाले.

Maratha Reservation : मनोज जरांगेंपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा; बावनकुळेंचं मोठं वक्तव्य, मुंबईत आंदोलन न करण्याचं आवाहन

सरकार संवादासाठी तयार

मनोज जरांगे यांनीही शांततेची भूमिका घेतली आहे. मराठा समाजाने यापूर्वी शांततेत मूक मोर्चे काढून आपली ताकद दाखवली आहे. त्यामुळे आता आंदोलन करतानाही वातावरण बिघडणार नाही आणि सर्व काही शांततेत होईल, याची दक्षता घ्यावी, असं आवाहन दरेकरांनी केलं.

‘नेमकं काय हवंय ते सांगा, सरकार चर्चेला तयार आहे. मंत्री पाठवले जात आहेत आणि प्रश्नांची दखल घेतली जात आहे,’ असं सांगत दरेकरांनी जरांगेंना पुन्हा एकदा संवादाची भूमिका स्वीकारण्याचं आवाहन केलं.

Web Title: Maratha reservation manoj jarange mumbai protest pravin darekar reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • MLA Pravin Darekar

संबंधित बातम्या

Maratha Reservation Update: ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलन तापणार! जरांगे पाटलांकडून मुंबई आंदोलनाची घोषणा
1

Maratha Reservation Update: ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलन तापणार! जरांगे पाटलांकडून मुंबई आंदोलनाची घोषणा

Maratha Reservation : मनोज जरांगेंपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा; बावनकुळेंचं मोठं वक्तव्य, मुंबईत आंदोलन न करण्याचं आवाहन
2

Maratha Reservation : मनोज जरांगेंपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा; बावनकुळेंचं मोठं वक्तव्य, मुंबईत आंदोलन न करण्याचं आवाहन

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा
3

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
4

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.