Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : ‘गणेशोत्सवात मुंबईत येऊन अडचणी निर्माण करू नका,’ उदय सामंत यांचे मनोज जरांगेंना आवाहन

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले असून, त्यांच्या 15 पैकी 12 मागण्या सरकारने मान्य केल्याचा दावा केला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 08, 2026 | 06:18 PM
उदय सामंतांचा मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचा आग्रह

उदय सामंतांचा मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचा आग्रह

Follow Us
Follow Us:
  • उदय सामंतांचा मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचा आग्रह
  • जरांगेंच्या 15 पैकी 12 मागण्या मान्य केल्याचा सरकारचा दावा
  • गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत अडचणी निर्माण होईल असे पाऊल उचलू नये, असे आवाहन
 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे. मात्र, जे लोक सातत्याने समाजासाठी निर्णय घेत आहेत, त्यांच्यावरच टीका करण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे, अशी टीका उदय सामंत यांनी केली.

जरांगेच्या 12 मागण्या मान्य, तीन मागण्यांवर तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू

जरांगे पाटील यांनी सरकारसमोर 15 मागण्या मांडल्या होत्या. त्यापैकी 12 मागण्या मान्य करण्यात आल्या असून, उर्वरित तीन मागण्यांवर कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सामंत यांनी सांगितलं. त्यामुळे जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं, अशी सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका

दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांनी 12 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. दुसरीकडे, मागण्यांवर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येऊ नये, सामंतांचा सल्ला

मुंबईतील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात अडचणी निर्माण होतील असं कोणतंही पाऊल मनोज जरांगे पाटील यांनी उचलू नये, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं.

दरम्यान, भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य केलं. ज्या मागण्यांवर जरांगे यांचं समाधान झालेलं नाही, त्यावर चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा समाजासाठी जरांगे लढत आहेत. समाजाच्या मागण्या मार्गी लागत असतील तर त्यांनी उपोषण मागे घ्यावं, असं प्रसाद लाड म्हणाले.

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte: ’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी

Web Title: Maratha reservation uday samant appeal manoj jarange mumbai ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Uday Samant

संबंधित बातम्या

‘आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…’; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?
1

‘आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…’; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या
2

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी
3

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी

58 लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायतींत लागणार; 10 ते 17 सप्टेंबर काळात विशेष शिबिरे घेणार
4

58 लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायतींत लागणार; 10 ते 17 सप्टेंबर काळात विशेष शिबिरे घेणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.