Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : उत्पन्न लाखात मात्र संपत्ती करोडोंची ; पालिकेतील सत्तेचे लाभार्थी ठरलेले माजी नगरसेवक

  मीरा भाईंदर महापालिकेत २०१७ साली निवडून आलेल्या आणि पुन्हा निवडणूक रिंगणात असलेल्या अनेक माजी नगरसेवकांच्या संपत्तीत दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या ८ वर्षात अनेकांची संपत्ती दुपटी पासून ५ पटीने वाढली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 12, 2026 | 01:09 PM
Mira Bhayander : उत्पन्न लाखात मात्र संपत्ती करोडोंची ; पालिकेतील सत्तेचे लाभार्थी ठरलेले माजी नगरसेवक
Follow Us
Close
Follow Us:
  • उत्पन्न लाखात मात्र संपत्ती करोडोंची
  • पालिकेतील सत्तेचे लाभार्थी ठरलेले माजी नगरसेवक
भाईंदर/ विजय काते :  मीरा भाईंदर महापालिकेत २०१७ साली निवडून आलेल्या आणि पुन्हा निवडणूक रिंगणात असलेल्या अनेक माजी नगरसेवकांच्या संपत्तीत दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या ८ वर्षात अनेकांची संपत्ती दुपटी पासून ५ पटीने वाढली आहे. अनेकांची मालमत्ता नगरसेवक झाल्यावर  स्वतःची व निकटवर्तीयांची घरं भरल्याचा आरोप केला जात आहे.  अनेक माजी नगरसेवक उमेदवारांनी त्यांची मालमत्ता मुलांच्या नावे केली आहे. तर अनेकांनी त्यांच्या निकटवर्तीयांच्या नावे फिरवल्याची देखील चर्चा आहे. वार्षिक उत्पन्न काही लाखात मात्र संपत्ती करोडोंची आहे. कोणी नोकरी तर कोणी व्यवसाय उत्पन्नाचे साधन दाखवले आहे. आगरी समाजातील काहींच्या मालमत्ता ह्या वारसा हक्काने जमिनी मिळाल्याने तसेच मालमत्ता – जमिनींचे भाव वाढल्याने वाढलेल्या दिसतात. त्यातही भाजपाच्या माजी नगरसेवकांच्या मालमत्ता दुपटीपेक्षा जास्त वाढल्याने महापालिकेतील २०१७ पासूनची सत्ता त्यांना चांगलीच फळली असल्याचे दिसून येते.

निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार भाईंदर पूर्वेच्या प्रभाग ४ मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धनेश परशुराम पाटील यांची १४३ कोटी ९५ लाखांची संपत्ती आहे. त्यापैकी तब्बल १४० कोटी ४९ लाख रुपयांची जमीन, सदनिका आदी स्थावर मालमत्ता आहे. मागील निवडणुकीत ३१ कोटी १८ लाखांची संपत्ती दर्शवली होती. त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. प्रभाग १२ मधील भाजपचे माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांची मागील निवडणुकीत असलेली ४ कोटी ५५ लाख रुपयांची संपत्ती तब्बल १४ कोटी पर्यंत वाढली आहे. त्यामुळे भाजपाचे प्रभाग ८ मधील सुरेश खंडेलवाल यांची २०१७ मध्ये असलेली ५ कोटी ५७ लाख रुपयांची संपत्ती २५ कोटी ३३ लाख वर पोहचली आहे. भाजपचे ध्रुवकिशोर पाटील यांची संपत्ती ९८ लाखांवरून १ कोटी ८८ लाख झाली आहे. ध्रुवकिशोर राहतात तो आलिशान मोठा फ्लॅट मात्र त्यांच्या भावाच्या नावे आहे. पाटील यांच्या निकटवर्तीय भाजपा उमेदवार ऍड. श्रद्धा कदम यांची संपत्ती तब्बल ५ कोटी ६ लाख आहे.

माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांच्या पत्नी मयुरी यांनी २ कोटी ७ लाख मालमत्ता दाखवली आहे. सचिन यांनी गेल्यावेळी ७४ लाख २५ हजार मालमत्ता दाखवली होती. प्रभाग २३ मधील भ्रष्टाचारच्या गुन्ह्यात ५ वर्षांची शिक्षा झालेल्या भाजपा उमेदवार वर्षा भानुशाली यांची १ कोटी १० लाखांची संपत्ती यंदा ३ कोटी १९ लाखांवर गेली आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी लाच घेताना पकडलेले प्रभाग १ मधील भाजपाचे अशोक तिवारी यांची संपत्ती १ कोटी ८१ लाखांवरून तब्बल ६ कोटी ८७ लाख झाली आहे.

“ही सगळी लाचार माकडं!” उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला; जाणून घ्या भाषणातील ठळक मुद्दे

भाजपाचे माजी नगरसेवक उमेदवार

प्रभाग १२
माजी महापौर डिम्पल मेहता
२०१७ ची मालमत्ता : २६ कोटी ७८ लाख
२०२६ ची मालमत्ता : ३० कोटी ६८ लाख

प्रभाग ७
ऍड . रवी व्यास
२०१७ ची मालमत्ता : ५ कोटी १५ लाख
२०२६ ची मालमत्ता : १० कोटी ७० लाख

प्रभाग २
शानू गोहिल
२०१७ ची मालमत्ता : ९७लाख
२०२६ ची मालमत्ता : ३ कोटी ३९ लाख

मदन सिंह
२०१७ ची मालमत्तां : १ कोटी २ लाख
२०२६ ची मालमत्तां : २ कोटी ६१ लाख

प्रभाग ३
गणेश शेट्टी
२०१७ ची मालमत्तां :४ कोटी १ लाख
२०२६ ची मालमत्तां : ९ कोटी ७७ लाख

प्रभाग ५
मुन्ना सिंह
२०१७ ची मालमत्तां :४३ लाख
२०२६ ची मालमत्तां :१ कोटी ३ लाख

Raj Thackeray On BJP : गैरव्यापार करणाऱ्या अदानी समुहावर भाजपाची कृपादृष्टी; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका

वंदना मंगेश पाटील
२०१७ ची मालमत्तां :१२ कोटी ११ लाख
२०२६ ची मालमत्तां : १३ कोटी ५२ लाख

प्रभाग ६
सुनीता जैन
२०१७ ची मालमत्तां :३ कोटी १ लाख
२०२६ ची मालमत्तां : १ कोटी ४५ लाख

प्रभाग १४
माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे
२०१७ ची मालमत्तां :४ कोटी ७९ लाख
२०२६ ची मालमत्तां :६ कोटी ८४ लाख

मीरादेवी यादव
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी ६० लाख
२०२६ ची मालमत्तां :३ कोटी ६४ लाख

प्रभाग १५
मोहन म्हात्रे
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी ७० लाखा
२०२६ ची मालमत्तां : ३ कोटी २८ लाख

सुरेखा सोनार
२०१७ ची मालमत्तां :२ कोटी ७१ लाख
२०२६ ची मालमत्तां :३ कोटी ६४ लाख

प्रभाग १६
वंदना भावसार
२०१७ ची मालमत्तां : ५८ लाख
२०२६ ची मालमत्तां :२ कोटी २ लाख

प्रभाग १७
प्रशांत दळवी
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी ७९ लाख
२०२६ ची मालमत्तां :३ कोटी ७१ लाख

दीपिका अरोरा
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी ५९ लाख
२०२६ ची मालमत्तां :२ कोटी ४२ लाख

हेमा बेलानी
२०१७ ची मालमत्तां :६ कोटी १५ लाख
२०२६ ची मालमत्तां :९ कोटी १० लाख

प्रभाग १८
नीला सोन्स
२०१७ ची मालमत्तां :५ कोटी ६२ लाख
२०२६ ची मालमत्तां :११ कोटी २८ लाख

प्रभाग २०
दिनेश जैन
२०१७ ची मालमत्तां :२ कोटी २ लाख
२०२६ ची मालमत्तां :५ कोटी ५ लाख

हेतल परमार
२०१७ ची मालमत्तां :३५ लाख
२०२६ ची मालमत्तां :१ कोटी १७ लाख

प्रभाग २१
मनोज दुबे
२०१७ ची मालमत्तां :२ कोटी ९१ लाख
२०२६ ची मालमत्तां :६ कोटी ६५ लाख

अनिल विराणी
२०१७ ची मालमत्तां :३ कोटी २० लाख
२०२६ ची मालमत्तां :४ कोटी ६ लाख

प्रभाग २३
जयेश भोईर
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी १२ लाख
२०२६ ची मालमत्तां :२ कोटी २८ लाख

भाजपाच्या माजी नगरसेवक बंडखोरांची संपत्ती पण वाढलेली

प्रभाग १
रिटा शाह
२०१७ ची मालमत्तां :३ कोटी ३७ लाख
२०२६ ची मालमत्तां :५ कोटी ३८ लाख

प्रभाग ४
गणेश भोईर
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी ५६ लाख
२०२६ ची मालमत्तां : २ कोटी ३ लाख

प्रभात पाटील
२०१७ ची मालमत्तां :३ कोटी ६५ लाख
२०२६ ची मालमत्तां : ५ कोटी ९९ लाख

प्रभाग ५
डॉ. प्रीती पाटील
२०१७ ची मालमत्तां :३४ कोटी ७१ लाख
२०२६ ची मालमत्तां :४३ कोटी ५४ लाख

सुनीता भोईर
२०१७ ची मालमत्तां : ६१ लाख
२०२६ ची मालमत्तां :७ कोटी ७ लाख

प्रभाग ९
नरेश पाटील
२०१७ ची मालमत्तां :५५ लाख
२०२६ ची मालमत्तां : १ कोटी ५४ लाख

शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक उमेदवार

प्रभाग ८
माजी महापौर कॅटलीन परेरा
२०१७ ची मालमत्तां : ६ कोटी ७५ लाख
२०२६ ची मालमत्तां :१४ कोटी ६३ लाख

प्रभाग १०
तारा विनायक घरत
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी ८७ लाख
२०२६ ची मालमत्तां :५ कोटी ५३ लक्ष

प्रभाग ११
वंदना आणि विकास पाटील
२०१७ ची मालमत्तां : ६ कोटी ३१ लाख
२०२६ ची मालमत्तां :११ कोटी ८१ लाख

प्रभाग १५
कमलेश भोईर
२०१७ ची मालमत्तां :७८ लाख
२०२६ ची मालमत्तां :१ कोटी २९ लाख

प्रभाग १६
भावना व राजू भोईर
२०१७ ची मालमत्तां :११ कोटी
२०२६ ची मालमत्तां :१३ कोटी ३० लाख

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रभाग ३ मधील उमेदवार नीलम ढवण यांची मालमत्ता देखील
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी ९० लाख
२०२६ ची मालमत्तां :४ कोटी ६३ लाख

एकीकडे सर्वसामान्य नागरिक महागाई, करभार आणि मूलभूत सुविधांसाठी झगडत असताना लोकप्रतिनिधींच्या संपत्तीतील ही ‘उत्तुंग भरारी’ मतदारांसाठी चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरत आहे. येत्या निवडणुकीत मतदार या संपत्तीवाढीचा हिशेब मतपेटीतून देतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mira bhayander income in lakhs but assets worth crores former corporator who became a beneficiary of power in the municipality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • mira bhaindar
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

पुनर्विकासासंबंधी अडचणींसाठी ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करणार; राघवेंद्र बाप्पु मानकर यांची माहिती
1

पुनर्विकासासंबंधी अडचणींसाठी ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करणार; राघवेंद्र बाप्पु मानकर यांची माहिती

Political News: राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच मनसेला मोठा धक्का, ‘या’ बड्यानेत्याने हाती घेतला भाजपचा झेंडा
2

Political News: राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच मनसेला मोठा धक्का, ‘या’ बड्यानेत्याने हाती घेतला भाजपचा झेंडा

Navi Mumbai Election : पनवेलकरांचा भाजपाला दणदणीत पाठिंबा; सरस्वती काथारा यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद
3

Navi Mumbai Election : पनवेलकरांचा भाजपाला दणदणीत पाठिंबा; सरस्वती काथारा यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध
4

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.