प्रचारसभेत राज ठाकरेंनी पुराव्यानिशी अदानी समुह आणि भाजपवरआरोप केले. नरेंद्र मोदी जेव्हा 2016 मध्ये पंतप्रधान पदी निवडून आल्यानंतर अदानी समुहाचा विस्तार देशभरात गेल्या दहा वर्षात वाढला. वीज प्रकल्प, जहाज निर्मिती यासगळ्यात अदानी समुहाचा विस्तार कोणाच्या पाठींब्यामुळे झाला ? इतक्या वर्षात अदानी समुह कधीच सिमेंटच्या क्षेत्रात आले नव्हते. आज सिमेंट व्य़ापारात होणाऱ्या गैरप्रकारात अदानी समुह सगळ्यात अग्रेसर आहे. राज ठाकरेंनी प्रचारसभेत याबाबतचा धक्कादायक व्हिडीओ सादर केला.
भाजपाचा महाराष्ट्रातुन मराठी माणसाला हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज कोट्यावधीचा घोटाळा गौतम अदानी यांनी केला असूनही महायुती सरकार अदानी समुहाला पाठींबा का देत आहे याचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने करणं गरजेचं आहे. आज ही मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी हृताम्यांनी प्राण पणाला लावले आणि आज तीच मुंबई मराठी माणसापासून दूर करण्याचे प्रयत्न महायुती करत आहे. आज मुंबई स्वत:चं घर घेणं देखील मराठी माणसाला महाग होत चाललं, मुंबईतून मराठी माणूस हळूहळू निघून जाण्यास हे परप्रांतीय जबाबदार आहे आणि हे केवळ आणि केवळ महायुती सरकारच्या कृपादृष्टीने होत असल्याची परखड टीका राज ठाकऱे यांनी केली.






