
Rohit Pawar, NEET UG, NEET Re Exam, Paper Leak, UG NEET Re Exam Paper Leak Gujarat Link
अजित पवारांचा अपघाती मृत्यूचा सीबीआय तपास करत आहे. डीजीसीए आणि विमान कंपनी वरती गुन्हा दाखल करावा ही मागणी रोहित पवारांनी केली आहे. यासाठी रोहित पवार यांच्यासह युगेंद्र पवार, राजेंद्र पवार आणि वकिल देखील बारामती पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात पवारांचे समर्थक बारामती पोलीस स्टेशनसमोर दाखल झाले आहेत. पोलिसांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर दिली तरी एफआयआर दाखल केला जात नाही असे मत वकिलांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?
आमदार रोहित पवार, राजेंद्र पवार आणि युगेंद्र पवार हे बारामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. मागील एक तासाहून अधिक काळ त्यांची पोलिसांसोबत चर्चा सुरु आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून घोषणाबाजी देखील आहे. आमदार रोहित पवार, योगेंद्र पवार, आणि राजेंद्र पवार बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दाखल झाले आहेत. पोलीस ठाण्यात ते पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली आहे.
गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बारामतीतील वकीलही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पोलीस अधिकारी आणि रोहित पवार गुन्हा दाखल करण्यासंदर्भात चर्चा करत आहेत. व्हीएसआर कंपनीकडून हलगर्जीपणा झाला असून यामुळे राज्यातील मोठा नेता गेला. मनुष्यवधाचा गुन्हा कंपनीवर दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
हे देखील वाचा : भिगवण अपहरण प्रकरणाला नवे वळण; तरुणीने कोर्टातच व्यक्त केली ‘ही’ इच्छा
याबाबत युगेंद्र पवार म्हणाले की,” व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. इथे दादांचे समर्थक, दादांचे प्रेमी आणि बारामतीचे नागरिक जमले आहेत आणि संबंधित कंपनीवरती गुन्हा दाखल व्हावा, योग्य ती कारवाई व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे, आम्ही सगळे रोहित दादांच्या मागे उभे आहोत. अजित दादांना न्याय मिळाला पाहिजे, या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे, बारामती पोलिसांकडून न्याय मिळेल याची आम्हाला 100% खात्री आहे” असे मत युगेंद्र पवार यांनी व्यक्त केले.