Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar PC : अजित पवारांच्या अपघाताला नवे वळण! घटनेपूर्वी बारामती विमान तळाची रेकी? आमदार रोहित पवार यांचा धक्कादायक दावा

अजित पवारांच्या अपघाताच्या तपासासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी विमान अपघातापूर्वी विमानतळाची रेकी केली असल्याचा गंभीर दावा केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 04, 2026 | 12:37 PM
MLA Rohit Pawar Press Conference live on ajit pawar Accident marathi news

MLA Rohit Pawar Press Conference live on ajit pawar Accident marathi news

Follow Us
Follow Us:
  • आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद
  • अजित पवारांच्या अपघातावर संशय व्यक्त
  • अपघातापूर्वी विमानतळाची रेकी केल्याचा दावा
 

Rohit Pawar PC : मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. बारामतीमध्ये झालेल्या या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यावर आता संशय व्यक्त केला जात असून हा घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवारांच्या अपघाताची (Ajit Pawar Plane Crash) पूर्ण सखोल चौकशी व्हावी यासाठी रोहित पवार (Rohit Pawar) पूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन अपघाताच्या अहवालावर ताशेरे ओढले आहेत.

आमदार रोहित पवार यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी ते म्हणाले की, मी हे स्पष्ट करु इच्छितो की मी VSR किंवा DGCA च्या विरोधात नाही. पण अजित पवारांचा जो अपघात झाला ते विमान याच कंपनीचे होते. या अपघाताचे सत्य सर्वांसमोर यावे यासाठी मी प्रयत्न करतो आहे. या विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. हा वाचवा वाचवीचा कार्यक्रम कोणत्या मोठ्या व्यक्तीमुळे केला जात आहे का? असे असेल तर अजित पवार यांचा अपघात होता की घातपात होता याचा तपास कधीच पूर्ण होणार नाही. योग्य रितीने तपास होणार नाही म्हणून मी हे बोलतो आहे.

हे देखील वाचा : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण

पुढे रोहित पवार यांनी अहवालामध्ये करण्यात आलेल्या चुकांवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, विमान हे आधी सुरतला गेले होते हे आता रिपोर्टमध्ये आले आहे. इंधन क्षमतेच्या 90 टक्के इंधन हे भरलेलं होतं. नंतर या विमानाचे 85 तास उरले होते असे म्हटले होते. प्रत्यक्षात विमान उड्डाणाचे तीन हजार तास जास्त झाले होते, एवढं तरी सत्य समोर आलं आहे. दृश्यमानता कमी होती आणि मुख्य पालयट काहीच बोलत नव्हता हे देखील समोर आले आहे. कोणत्याही व्हीआयपी लोकांच्या अपघाताची आणि खास करुन विमान अपघाताची चौकशी केली जाते तेव्हा तपास यंत्रणेने डोळ्यात तेल घालून तपास करण्याची गरज असते, अशी देखील अपेक्षा रोहित पवारांनी बोलून दाखवली आहे.

हे देखील वाचा :  समृद्धी महामार्गावर शिवडे येथे इंटरचेंज, एमएसआरडीसी-सार्वजनिक बांधकाम विभागाची चाचपणी

त्याचबरोबर रोहित पवार यांनी विमानतळाची रेकी केली असल्याचा गंभीर दावा केला आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, “काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती. अपघातापूर्वी रेकी झाली होती. याची आम्हाला पक्की माहिती नाही. पण त्या अँगलने चौकशी झाली पाहिजे. कालच्या रिपोर्टमध्ये कोणत्याही इन्व्हेस्टिगेटरचं नाव दिलेलं नाही. कागदपत्रात हेराफेरी होण्याची शक्यता असल्याने नाव दिलं नसेल. २३ तारखेचा एआयबीचा रिपोर्ट आहे. त्यात इन्व्हेस्टिगेटींग करणाऱ्यांचं नाव आहे. पण अजितदादांच्या रिपोर्टमध्ये नाव नाही. अजितदादांबाबतच असा भेदभाव का?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Mla rohit pawar press conference live on ajit pawar accident marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • baramati news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
1

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला
2

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Bombay HC Clerk Typing Test : मोठी बातमी ! हायकोर्टाच्या लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द; तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय
3

Bombay HC Clerk Typing Test : मोठी बातमी ! हायकोर्टाच्या लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द; तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.