Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक, ‘हे भ्याड सरकार आहे,’ म्हणत केला हल्लाबोल

जंतरमंतरवरील आंदोलनातून सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी हटवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. जयंत पाटील, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी लोकशाहीतील आंदोलनाच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Jul 18, 2026 | 03:10 PM
सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक, 'हे भ्याड सरकार आहे,' म्हणत केला हल्लाबोल

सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक, 'हे भ्याड सरकार आहे,' म्हणत केला हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर जयंत पाटील, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडांचा निषेध
  • ‘लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे’ – जयंत पाटील
  • ‘भ्याड सरकार’ म्हणत केंद्रावर जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
 

दिल्लीतील जंतरमंतर मैदानात सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या ठिकाणाहून दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने सोनम वांगचुक यांना उचलून नेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. इतकेच नव्हे तर, सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनाही पोलिसांनी मारहाण करत त्यांना डांबून ठेवण्यात आले. यामुळे जंतरमंतरवर काही वेळासाठी मोठा गोंधळ उडाला होता. यावरून देशभरात मोठा गोंधळ उडाला असून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. अश्यातच आता राजकीय नेत्यांकडूनही या कारवाईला विरोध होत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत आपला रोष व्यक्त केला आहे.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 21 वा दिवस होता. NEET परीक्षांच्या पेपरफुटीनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन दिल्लीतील जंतर मंतर येथे पार पडत आहे. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राष्टवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत या कारवाईचा निषेध केला आहे.

Abhijeet Dipke : सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलन पेटले; अभिजीत दिपकेंवर शाईफेक, उपोषणाची घोषणा

रोहित पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा

आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून रोहित पवार म्हणाले, “एक निस्पृह व्यक्ती आपल्या ध्येयापासून हटत नसल्याचं दिसताच घाबरलेल्या केंद्र सरकारने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने उपोषणस्थळावरून हलवून रुग्णालयात दाखल केलं. यातून केंद्र सरकारला नेमका काय संदेश द्यायचाय? आम्ही आंदोलन मोडून काढू, पण आंदोलकांची मागणी मान्य करणार नाही, हाच तो संदेश आहे ना? अशी जबरदस्ती करण्यापेक्षा सरकार निष्क्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही? सरकारचा हा अहंकार लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे!”

एक निस्पृह व्यक्ती आपल्या ध्येयापासून हटत नसल्याचं दिसताच घाबरलेल्या केंद्र सरकारने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने उपोषणस्थळावरून हलवून रुग्णालयात दाखल केलं. यातून केंद्र सरकारला नेमका काय संदेश द्यायचाय? आम्ही आंदोलन मोडून काढू, पण… — Rohit Pawar (@RRPSpeaks) July 18, 2026

लोकशाहीत आंदोलनाचा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार – जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले, “सोनम वांगचुक यांच्या मागण्यावर विचार न करता आंदोलन दडपण्यासाठी त्यांना आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन दवाखान्यात हलवल्याची घटना अत्यंत चिंताजनक आहे. लोकशाहीत आंदोलनाचा आणि मत मांडण्याचा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने आंदोलकांच्या मागण्यांवर संवेदनशीलतेने चर्चा करून मार्ग काढावा. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज ऐकला गेला पाहिजे.”

सोनम वांगचुक यांच्या मागण्यावर विचार न करता आंदोलन दडपण्यासाठी त्यांना आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन दवाखान्यात हलवल्याची घटना अत्यंत चिंताजनक आहे. लोकशाहीत आंदोलनाचा आणि मत मांडण्याचा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने आंदोलकांच्या मागण्यांवर… — Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 18, 2026

“गेंड्याच्या कातडीचे भ्याड सरकार,” जितेंद्र आव्हाड आक्रमक

जितेंद्र आव्हाड याबाबत भाष्य करत म्हणाले, “हे भ्याड सरकार आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनास बसलेल्या सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या मदतीने हटवले.यासोबतच आंदोलनकर्त्यांवर देखील पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला.”

हे भ्याड सरकार आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनास बसलेल्या सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या मदतीने हटवले.यासोबतच आंदोलनकर्त्यांवर देखील पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला.
गेल्या 20 दिवसापासून सोनम हे आंदोलनाला बसले होते.पण या गेंड्याच्या कातडीच्या… pic.twitter.com/P3CfuW8xfX
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 18, 2026

“गेल्या 20 दिवसापासून सोनम हे आंदोलनाला बसले होते.पण या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने त्यांच्याशी साधी चर्चा करण्याचा देखील शिष्टाचार दाखवला नाही. हा सत्तेचा माज आहे,जो कायम चालणार नाही हे इथल्या उन्मत्त सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावे..!”

Modi Must Resign: आता धर्मेद्र प्रधानांचा नाही थेट नरेंद्र मोदींचा राजीनामा..! जंतर-मंतरवरील राड्यानंतर अभिजीतचा आक्रमक पवित्रा

Web Title: Ncp sharad pawar group reacts sonam wangchuk detention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • Cockroach Janata Party
  • jayant patil
  • Jitendra Awhad
  • rohit pawar
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Dharmendra Pradhan : ‘सत्तापालटासाठी आंदोलन?’ धर्मेंद्र प्रधानांचे गंभीर आरोप; राहुल गांधी, CJP वर साधला जोरदार निशाणा
1

Dharmendra Pradhan : ‘सत्तापालटासाठी आंदोलन?’ धर्मेंद्र प्रधानांचे गंभीर आरोप; राहुल गांधी, CJP वर साधला जोरदार निशाणा

Tiranga March : दिल्लीमध्ये तिरंगा आंदोलनाआधी मोठी घडामोड! अभिजीत दीपके यांच्या घरी पोलीस दाखल, कॅनॉट प्लेसमध्ये हाय अलर्ट
2

Tiranga March : दिल्लीमध्ये तिरंगा आंदोलनाआधी मोठी घडामोड! अभिजीत दीपके यांच्या घरी पोलीस दाखल, कॅनॉट प्लेसमध्ये हाय अलर्ट

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन
3

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन

Abhijeet Deepke : ‘त्या भाजपच्या बाजूने बोलू शकतात पण…’ इम्रान खानच्या नोटिशीवर अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया
4

Abhijeet Deepke : ‘त्या भाजपच्या बाजूने बोलू शकतात पण…’ इम्रान खानच्या नोटिशीवर अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.