mla rohit pawar target mns raj thackeray for criticizing ganga water in mahakumbh 2025
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यावरुन महाराष्ट्रामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. महाकुंभमेळ्यातील गंगेच्या पाण्यावरुन राजकारण रंगले आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळ्याव्यामध्ये गंगेच्या पाण्यावर वक्तव्य केले. यावेळी त्यांनी भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
144 वर्षांनी होण्याऱ्या या महाकुंभमेळ्यामध्ये कोट्यवधी भाविकांनी स्नान करुन तीर्थ समजून पाणी प्राशन केले. मात्र नंतर सादर झालेल्या अहवालामध्ये हे पाणी अतिशय अशुद्ध असून पिण्यासाठी योग्य नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. यावरुन राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात याबाबत वक्तव्य केले. मनसेच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित खास मेळाव्यात ते बोलत होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले राज ठाकरे?
मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे नेते राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, “चार वर्षांपूर्वी कोरोना होऊन गेला. तेव्हा आपण तोंडाला कापड लावून फिरलो. आणि आता कुंभमेळ्यात जाऊन स्नान करतो. देशातील एकही नदी स्वच्छ नाही. परदेशातील नद्या बघा सर्वांनी. गंगा स्वच्छ होणार, हे मी राजीव गांधी यांच्यापासून ऐकत आलो आहे. पण गंगा स्वच्छ झालेली नाही. बाळा नांदगावकर यांनी कुंभमेळ्यातून गंगेचे पाणी माझ्यासाठी आणले होते. मी त्यांना म्हटले, हड… मी ते पिणार नाहीये. आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत स्पष्ट असले पाहिजे,” असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.
यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, “आम्ही देखील गेलो होतो. आम्ही पण तिथून पाणी घेऊन आलो लोकांना दिलं ते फिल्टर करुन दिलं तर त्यांची ताकद कमी होतं नाही. त्यांनी वक्तव्य करताना क्लिअर केलं पाहिजे होतं की ते प्रदुषणाबद्दल बोलत आहेत. लोकांना भावना दुखावतील असं वक्तव्य त्यांनी टाळलं पाहिजे होतं,” असे स्पष्ट मत आमदार रोहित पवार यांनी वक्तव्य केले होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला असून त्यांच्या आश्वासनांची आठवण करुन दिली आहे. रोहित पवार यांनी विधीमंडळ आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार म्हणाले की,”बजेट मधून सगळ्यांचीच अपेक्षा आहे कर्ज माफी होईल भावांतर योजना कांद्याचा सोयाबीनचा भाव पडला त्यांची भरपाई सरकार देईल. बेरोजगार युवकांना भत्ता चालू व्हावा त्यांनीच शब्द दिला होता, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार, अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम घेण्यात येईल त्यासाठी निधी देणार असं त्यांनी सांगितलं होतं, ते त्यांना करावंच लागेल नाहीतर लोकं आणि आम्ही शांत बसणार नाही,” असे स्पष्ट मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.