आमदार रोहित पवार यांनी अर्थसंकल्पावर महायुती सरकारवर निशाणा साधला आहे (फोटो - नवराष्ट्र)
बारामती : राज्यामध्ये महायुती सरकार दुसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर पहिला अर्थसंकल्प जाहीर केला जात आहे. 03 मार्च पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे 11 व्यांदा अर्थसंकल्प जाहीर करणार आहे. महायुतीकडून राज्यातील शेतकरी, तरुण, महिला, विद्यार्थी आणि उद्योगक्षेत्रातून मोठी अपेक्षा लागली आहे. यावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करुन दिली आहे.
राज्यामध्ये काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक पार पडली. यावेळी महायुतीसह महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी आश्वासनांचा अक्षरशः पाऊस पाडला. यामध्ये महायुतीने शेतकऱ्यांसाठी आणि लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवण्यावर अधिक भर दिला होता. याचा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये देखील समावेश केला होता. या सर्व आश्वासनांची पूर्तता ही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये व्हावी अशी अपेक्षा विरोधकांनी व्यक्त केली आहे. यासाठी विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार यांनी एक्स (ट्वीटर) महायुतीच्या आश्वासनांची यादी टाकली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार रोहित पवार यांनी एक्स मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना महायुतीने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देणं क्रमप्राप्त आहे. या आश्वासनांचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसेल, अशी अपेक्षा आहे.
अशी यादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टाकली आहे.
आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना महायुतीने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देणं क्रमप्राप्त आहे. या आश्वासनांचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसेल, अशी अपेक्षा आहे. •लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रु.
•महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांची पोलीस भरती.
•शेतकरी कर्जमाफी आणि… — Rohit Pawar (@RRPSpeaks) March 10, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का?
राज्याच्या अर्थसंकल्पाकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत. मागील वर्षी निवडणूक समोर ठेवून महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. ही योजना बजेटमधील सर्वात लोकप्रिय योजना आणि घोषणा ठरली होती. निवडणुकीमध्ये देखील महायुतीसाठी ती गेमचेंजर ठरली होती. मात्र निवडणुकीमध्ये महायुतीने 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन या अर्थसंक्लपामध्ये पूर्ण होणार का याची सर्वांना उत्सुकता लागील आहे. लाडकी बहीण योजनेसाठी निधी वाढवून दिला जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.