Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“उमेदवारांचा लेखाजोखा…”, आमदार संग्राम जगताप यांचे मतदारांना ‘हे’ महत्वाचे आवाहन

मनपा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये अनेक राजकीय नेते आपापली सभा आयोजित करत आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस–भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सावेडी उपनगरात सभा आयोजित करण्यात आली होती.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 14, 2026 | 09:16 PM
"उमेदवारांचा लेखाजोखा...", आमदार संग्राम जगताप यांचे मतदारांना 'हे' महत्वाचे आवाहन

"उमेदवारांचा लेखाजोखा...", आमदार संग्राम जगताप यांचे मतदारांना 'हे' महत्वाचे आवाहन

Follow Us
Close
Follow Us:
  • सावेडीत राष्ट्रवादी काँग्रेस–भाजपा युतीची सभा
  • सभेत आमदार संग्राम जगताप यांचे जनतेला आव्हान
  • घड्याळाला दिलेले मत म्हणजे विकासाला दिलेले मत – आमदार संग्राम जगताप
अहिल्यानगर शहर वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून, मतदारांनी उमेदवारांचा लेखाजोखा तपासून मतदान करावे. घड्याळाला दिलेले मत म्हणजे विकासाला दिलेले मत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस–भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सावेडी उपनगरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

आमदार जगताप म्हणाले की, शहरातील डी.पी. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. सध्या या रस्त्यांवर पथदिवे बसविण्याचे काम सुरू असून, लवकरच संपूर्ण परिसरात प्रकाशाचा लखलखाट दिसणार आहे. पुढील टप्प्यात शहरातील उर्वरित डी.पी. रस्त्यांची कामे मार्गी लावली जाणार असून, गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, कुष्ठधाम रोड आदी रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? ठाकरे बंधूंना भाजप सोबत घेणार? फडणवीस स्पष्टच म्हणाले…

निवडणूक विकासाच्या व्हिजनवरच लढली पाहिजे

“निवडणुका या केवळ आरोप-प्रत्यारोपांवर नव्हे, तर विकासाच्या व्हिजनवर लढल्या पाहिजेत. नगरसेवक असा असावा, जो पाच वर्षे नागरिकांना वेळ देईल आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेल. काही लोक शहरात खोट्या अफवा पसरवत आहेत. मात्र नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता घड्याळासमोरील बटण दाबून विकासाला साथ द्यावी,” असे आवाहनही त्यांनी केले.

महाल परिसरात उभारले जाणार शहरातील सर्वात मोठे उद्यान

आमदार जगताप म्हणाले की, पूर्वी शहराची व्याप्ती केवळ हायवेपर्यंत मर्यादित होती. मात्र आता नागापूर गावठाण आणि पाईपलाईन हाडकोपर्यंत शहराचा विस्तार झाला आहे. 2018 च्या निवडणुकीत नागापूर गावठाण या प्रभागात समाविष्ट नव्हते. महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न 99 टक्के सुटला असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय भिस्तीबाग महाल परिसरात भव्य उद्यान विकसित करण्यात येणार असून, या भागाचे सुशोभीकरण केले जाईल. हे उद्यान अहिल्यानगर शहरातील सर्वात मोठे उद्यान असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

BMC Elections 2026 : दुबार मतदार सापडला तर त्याला तिथेच ठोका…! ठाकरे बंधूंनी आदेश दिल्याचे संजय राऊतांची कबुली

शहरात रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर कामे सुरू

शहरातील पत्रकार चौक ते जिल्हा पोलीस अधीक्षक चौक रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, दुभाजकाचे काम सुरू आहे. तसेच दिल्ली गेट ते नेप्तीनाका रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले असून, तेथे पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्येही विविध रस्त्यांची कामे सुरू असून, गुलमोहर रस्ता, संत नामदेव चौक, भिस्तबाग चौक, एकविरा चौक या रस्त्यांचे काँक्रिटीकरण शासनाच्या माध्यमातून केले जाणार आहे.

तसेच तपोवन ते पाईपलाईन ते टेलिफोन एक्सचेंजपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण होत असून, तोफखाना पोलीस ठाणे ते भिस्तबागपर्यंतचा रस्ताही काँक्रिटीकरण करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

ही निवडणूक जनतेसाठी आहे

स्वातंत्र्यानंतर प्रथमच तपोवन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असल्याचे सांगत आमदार जगताप म्हणाले, “आम्ही केवळ पदासाठी निवडणूक लढत नाही, तर विकासकामे पुढे नेण्यासाठी आणि जनतेसाठी वेळ देण्यासाठी निवडणूक लढत आहोत. 2018 मध्ये तपोवन रस्त्याच्या डांबरीकरणाचा संकल्प केला होता. येत्या पंचवार्षिक काळात या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्धार आहे. ज्या भागात विकास होतो, तेथेच लोकवस्ती वाढत जाते,” असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Mla sangram jagtap adressed voters in national congress bjp alliance sabha at savedi ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ahilyanagar politics
  • BJP

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या ‘या’ महत्वाच्या नेत्याला हृदयविकाराचा झटका!
1

Ahilyanagar News: ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या ‘या’ महत्वाच्या नेत्याला हृदयविकाराचा झटका!

Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा
2

Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Raj Thackeray Thane Speech: पाच पाच हजार रुपये तोंडावर फेकून मते मिळवण्याची हिंमत आली कुठून? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
3

Raj Thackeray Thane Speech: पाच पाच हजार रुपये तोंडावर फेकून मते मिळवण्याची हिंमत आली कुठून? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

Raj Thackeray on BJP: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; ‘पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे
4

Raj Thackeray on BJP: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; ‘पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.