MNS Raj Thackeray Press confernce after meeting with cm devendra fadnavis political news
Raj Thackeray Press : मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी अचानकपणे वर्षा बंगल्यावर भेट दिली. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधून भेटीचे कारण स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.
मनसे नेते राज ठाकरे म्हणाले की, “गेले काही महिन्यांपासून दोन ते तीन विषयांवर मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो आहे. शहर नियोजन हा माझ्या आवडीचा विषय आहे. मुंबई आणि जवळपासच्या परिसरामध्ये पुर्नविकासाची कामे मोठ्या प्रमाणामध्ये सुरु आहेत. ज्या ठिकाणी आधी 50 लोकं राहत होती आता तिथे 500 लोक राहत आहेत. त्यांच्या गरजा, ट्रॅफिक, गाड्या आणि कचरा सगळंच वाढलं आहे. हे सगळं रस्त्यावर आलंय. त्यामुळे शहराचा बट्याबोळ होत आहे,” असे मत मनसे नेते राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी पार्किंग व्यवस्था जी उभी करण्याची गरज आहे. काही प्रमाणात गाडी पार्किंग उपलब्ध आहे मात्र लोकं तिथं जात नाही. लोकांना गाड्यांबाबत शिस्त लावण्याची गरज आहे. बाहेरच्या राज्यातून इथे लोक आले आहेत त्यांना माहितीच नाही इथे कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे. त्या दृष्टीकोनातून मी मुख्यमंत्र्यांकडे एक आराखडा सादर केला आहे. यावेळी वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी काही नमूने सादर करत फोटो देखील दाखवले आहे. यावेळी मैदानाच्या खाली गाड्यांचे पार्किंग करावे आणि वरच्या बाजूस मुलांना खेळायला मैदान ठेवावे,” असे देखील राज ठाकरे यांनी सुचवले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे राज ठाकरे म्हणाले की, “रस्त्यावरील ट्रॅफिक बघून देशाचे भवितव्य लक्षात येते. दोन चाकी वाहने सिग्नल पाळत नाही. आधी रात्री 12 वाजता सिग्नल सुरु असेल तर गाड्या थांबायच्या आता दुपारी 12 वाजता सुद्धा गाड्या थांबत नाहीत. ही कायद्याला न जुमानणं ही बेशिस्त याने वाईट अवस्था होईल. शहरांचे पण काही नियम असतात. ते लोकांनी पाळणे गरजेचे आहे. या शहरांचा एका आराखडा आखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे हाताबाहेर गेलं तर कोणालाही आवरता येणार नाही,” अशी काळजी मनसे नेते राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.