Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा…! सामाजिक नेते बाबा आढाव यांच्यासाठी राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांचे पुण्यामध्ये निधन झाले. यामुळे एक छत्र हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मनसे नेते राज ठाकरेंनी खास पोस्ट केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 09, 2025 | 01:09 PM
MNS Raj Thackeray social media post on baba adhav passed away

MNS Raj Thackeray social media post on baba adhav passed away

Follow Us
Follow Us:
  • कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांचे निधन
  • मनसे नेते राज ठाकरे यांची बाबा आढावांसाठी खास पोस्ट
  • इंडिगो विमानच्या विस्कळीत सेवेचा केला उल्लेख
पुणे : कष्टकऱ्यांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव (Baba Adhav) यांचे आजारापणामुळे निधन झाले. हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांच्या न्यायासाठी लढा देणाऱ्या बाबा आढाव यांच्या जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले. मजुरांसाठी आणि कष्टकऱ्यांचे आभाळ कोसळले. त्यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाबा आढाव यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे गेले दहा दिवस त्यांच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचाराला प्रतिसाद न दिल्याने अखरे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर मनसे नेते राज ठाकरे यांनी बाबा आढाव यांच्यासाठी खास सोशल मीडिया पोस्ट लिहिले आहे. यामध्ये इंडिगो विमानच्या (Indigo Service) विस्कळीत सेवेचा देखील दाखला दिला.

मनसे नेते राज ठाकरे यांनी बाबा आढाव यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. यामध्ये लिहिले आहे की, ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या बाबा आढावांचं निधन झालं. महाराष्ट्राने या देशांत समाज प्रबोधनाचा सज्जड पाया घातला आणि सामाजिक कार्यकर्यांच मोहोळ तयार केलं. त्यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव बाबा आढाव.

हे देखील वाचा : मी माझ्या पगारावर समाधानी…! सरकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमप्लेट व्हायरल

बाबा आढाव हे पेशाने डॉक्टर. पण डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात ढकलून घेतलं. महाराष्ट्राचं हे एक वैशिष्ट्य की, सामाजिक क्षेत्रांत उत्तुंग कार्य केलेली माणसं, उच्चशिक्षित आणि जर त्यांनी त्यांच्या क्षेत्रांत करिअर करायचं ठरवलं असतं तर तितकीच मोठी कारकीर्द घडवू शकले असते अशी माणसं सामाजिक क्षेत्रांत आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला आकार दिला. हल्ली अशी माणसं तयार होत आहेत का ? माहित नाही. हल्ली सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणारे, स्वतःचे तशा नावाचे फ्लेक्स लावणाऱ्यांचा सुळसुळाट आहे.

ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या बाबा आढावांचं निधन झालं. महाराष्ट्राने या देशांत समाज प्रबोधनाचा सज्जड पाया घातला आणि सामाजिक कार्यकर्यांच मोहोळ तयार केलं. त्यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव बाबा आढाव. बाबा आढाव हे पेशाने डॉक्टर. पण डॉक्टरकीचा व्यवसाय… pic.twitter.com/OGKpDnRWwJ — Raj Thackeray (@RajThackeray) December 9, 2025

“असो, पण रिक्षा पंचायत असो, हमाल पंचायत असो की १९७२ साली एक गाव एक पाणवठासाठी उभी केलेली चळवळ असो, की १९६९ ला राज्यात मंजूर झालेला महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा असो, हे बाबांचं मोठं योगदान.”

हे देखील वाचा : तो मीच आहे का? अंबादास दानवेंच्या आरोपाला महेंद्र दळवींचा पलटवार

“बाबा आढावांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी, असंघटित कामगार आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष उभा केला. आर्थिक उदारीकरणाच्या नंतरच्या काळात कामगारांचं आणि श्रमिकांच शोषण करणारी एक नवी व्यवस्था आता जन्माला आली आहे. आणि जिला सरकारचं समर्थन आहे. सध्या तर सरकारं ही उद्योगशरण आहेत आणि कामाचे तास, वेळा याबाबत सरकार उद्योगजगताला शिस्त देखील लावू शकत नाही, हे नुकत्याच विमान कंपनीच्या उदाहरणातून दिसलं. यामुळे संघटित असो की असंघटित कामगार किंवा नव्याने उदयाला येत असलेला ज्याला ‘गिग वर्कर’ म्हणता येईल असे सगळेच असुरक्षतितेच्या गर्तेत सापडले आहेत.”

ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या बाबा आढावांचं निधन झालं. महाराष्ट्राने या देशांत समाज प्रबोधनाचा सज्जड पाया घातला आणि सामाजिक कार्यकर्यांच मोहोळ तयार केलं. त्यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव बाबा आढाव. बाबा आढाव हे पेशाने डॉक्टर. पण डॉक्टरकीचा व्यवसाय… pic.twitter.com/OGKpDnRWwJ — Raj Thackeray (@RajThackeray) December 9, 2025


“बाबा आढावांची एकूणच समाजकारणाकडे बघण्याची भूमिका व्यापक होती आणि त्यामुळेच ईव्हीएमच्या विरोधात वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. हे खरं समाजकारण जे एनजीओ संस्कृती उदयाला येण्याच्या आधीच्या काळातलं, जिथे प्रत्येक विषयात मतं होती आणि ठोस भूमिका होती. बाबा आढावांसारखी माणसं परत या राज्यात कधी होतील ? माहित नाही, पण ती घडवण्याची शक्ती या भूमीत नक्की आहे, त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा. बाबा आढावांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली,” अशा शब्दांत मनसे नेते राज ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Mns raj thackeray social media post on baba adhav passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • Baba Adhav
  • Maharashtra Politics
  • Raj Thackeary

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमध्ये पुनर्वसनाचे आव्हान तर महाराष्ट्रात आंदोलनांचे वादळ
1

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमध्ये पुनर्वसनाचे आव्हान तर महाराष्ट्रात आंदोलनांचे वादळ

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
2

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
3

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
4

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.