Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी

राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया विचारण्यासाठी आलेल्या पत्रकारांवर खासदार संजय दिना पाटील कमालीचे संतप्त झाले असून, त्यांनी थेट पत्रकाराला मारण्याची धमकी दिली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 25, 2026 | 03:57 PM
खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या 'या' नेत्याकडून जाहीर माफी (Photo Credit- X)

खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या 'या' नेत्याकडून जाहीर माफी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’
  • खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी
  • शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी
ठाकरे गटाकडून निवडून आलेले आणि त्यानंतर शिंदे गटात जाणारे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया विचारण्यासाठी आलेल्या पत्रकारांवर खासदार संजय दिना पाटील कमालीचे संतप्त झाले असून, त्यांनी थेट पत्रकाराला मारण्याची धमकी दिली आहे. आज प्रसारमाध्यमांनी त्यांना सध्या सुरू असलेल्या राजकीय वादांबाबत प्रश्न विचारले असता, त्यांनी आक्रमक होत “पुन्हा इथे आलात तर मारून पाठवेन,” अशा शब्दांत पत्रकाराला थेट इशारा दिला.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, चालू राजकीय घडामोडींवर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर संजय दिना पाटील यांनी जाहीरपणे शिवीगाळ केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत माध्यमांना धमकावले. ते म्हणाले, “तुम्ही परत इकडे आलात तर तुम्हाला मारून पाठवेन, हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय. तुम्हाला जे करायचंय ते करा.” त्यांच्या या अशोभनीय वक्तव्यामुळे माध्यम क्षेत्र आणि राजकीय वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “लोकप्रतिनिधीने पत्रकारांशी अशी भाषा वापरणे कितपत योग्य?” असा सवाल उपस्थित करत माध्यम क्षेत्राकडून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

खा.संजय दिना पाटील पत्रकारांना धमकी देत असतानाचा व्हिडिओ.. 👇 pic.twitter.com/fsPJ1aENuy — Sampat More I संपत मोरे (@SampatMore2) June 25, 2026

पत्रकारांवर संतापले संजय दिना पाटील; ‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन’, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमकी

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी

संजय दिना पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पक्षाची कोंडी झाल्यानंतर शिवसेना प्रवक्ते, आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी तात्काळ माध्यमांसमोर येत जाहीर माफी मागितली आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शिरसाट म्हणाले, “गेल्या तीन-चार दिवसांपासून संजय दिना पाटील आणि संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. कोणी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत आहे, तर कोणी स्टेनगन घेऊन फोटो काढत आहे. अशा प्रकारांचे कोणीही समर्थन करणार नाही. संजय राऊत यांनी वापरलेल्या अपशब्दांमुळे कदाचित भावनेच्या भरात किंवा फ्रस्ट्रेशन आणि रागातून संजय पाटील यांच्या तोंडातून हे वाक्य निघाले असावे. पण त्यांनी पत्रकारांना जे काही वेडेवाकडे बोलले, त्याबद्दल मी सर्व पत्रकारांची जाहीर माफी मागतो.” लोकशाहीत अशी भाषा कोणीही वापरू नये, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

पक्षांतराची पार्श्वभूमी आणि शिंदेंची नाराजी?

उद्धव ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले संजय दिना पाटील या वादामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संजय पाटील यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र, “त्या दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले, ते त्यांचे त्यांनाच ठाऊक,” असे म्हणत शिरसाट यांनी या चर्चांवर अधिक बोलणे टाळले.

‘महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला ,’ वाढत्या गुन्हेगारीवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा

Web Title: Mp sanjay dina patil threatens journalist public apology from this shiv sena leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Maharashtra Political
  • MAL Sanjay Shirsat
  • political news
  • Sanjay Dina Patil

संबंधित बातम्या

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
1

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
2

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान
3

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.