Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZP Election 2026: ‘मिशन जिल्हा परिषद’साठी शिंदे मैदानात! महाबळेश्वरमधून प्रचाराचा शुभारंभ; ३ फेब्रुवारीपर्यंत सभांचा धडाका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वरमधून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 26, 2026 | 09:53 PM
'मिशन जिल्हा परिषद'साठी शिंदे मैदानात! महाबळेश्वरमधून प्रचाराचा शुभारंभ (Photo Credit- X)

'मिशन जिल्हा परिषद'साठी शिंदे मैदानात! महाबळेश्वरमधून प्रचाराचा शुभारंभ (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • ‘मिशन जिल्हा परिषद’साठी शिंदे मैदानात!
  • महाबळेश्वरमधून प्रचाराचा शुभारंभ
  • ३ फेब्रुवारीपर्यंत सभांचा धडाका
सातारा ( महाबळेश्वर): राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच १२ जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कंबर कसली असून त्यांचा शुभारंभ आज सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे घेतलेल्या प्रचार सभेद्वारे करण्यात आला आहे.

या झंझावाती प्रचार दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे हे २८ जानेवारी रोजी परभणी, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यात, तर २९ जानेवारी रोजी सोलापूर धाराशिव येथे, तर ३० जानेवारी रोजी पुणे सांगली जिल्ह्यात, ३१ जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यात, १ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर २ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी नगर आणि रायगड रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेवारासाठी प्रचारसभा घेणार आहेत. निवडणुका म्हटल्या की शिंदे प्रचारात कोणतीही कसूर ठेवत नाहीत त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान आल्याशिवाय राहणार नाही.

महाबळेश्वर, तापोळा, प्रतापगड, कुंभरोशी, वाडा परिसराच्या विकासावर भर देणार असून या परिसराची ओळख मिनी महाबळेश्वर, शांत महाबळेश्वर अशी प्रस्थापित करू, अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली. होमस्टे, फार्मस्टे, सेंद्रीय शेती, ग्रामीण पर्यटन, वॉटर स्पोर्ट्स, बॅकवॉटर पर्यटन, वेलनेस सेंटर,… https://t.co/mHhot6RbCw pic.twitter.com/3PGclmWHER — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 26, 2026


आज झालेल्या सभेत त्यांनी, सामान्य जनतेसाठी कामे न करता केवळ टीका करत राहिल्यामुळे जनतेने त्यांना घरी बसवले आहे. जनता नेहमी विकास करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते असा थेट आणि आक्रमक हल्लाबोल करत उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.

SRA आणि म्हाडाचा डंका! राज्य सरकारच्या १५० दिवसांच्या प्रगती पुस्तकात ‘एसआरए’ दुसऱ्या, तर ‘म्हाडा’ सहाव्या क्रमांकावर

नुसते “भावनिक ब्लॅकमेल करून सत्ता मिळत नाही. विकास करावा लागतो. रस्ते, पाणी, रोजगार, आरोग्य, शिक्षण, उद्योग, पर्यटन हेच शिवसेनेचे अजेंडा आहे. कोर्टात जा, स्थगिती आणा, प्रकल्प रोखा, सण-उत्सव बंद करा, मंदिर बंद करा, मेट्रो, समृद्धी महामार्ग, कारशेड, विकास प्रकल्पांवर स्पीड ब्रेकर लावा हेच त्यांचे काम. आम्ही मात्र ते स्पीड ब्रेकर हटवून महाराष्ट्राला गती दिल्याचे सांगितले.

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महायुतीला २३२ जागा मिळाल्या. शिवसेना विधानसभेत, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका निवडणुकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली. चांदा ते बांदा शिवसेना पोहोचली आहे. जे रोज टीका करतात, ते आता पाचव्या-सहाव्या क्रमांकावर गेले असल्याचे सांगत त्यांनी आपल्या सभेतून उबाठा गटाचा समाचार घेतला.

महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर आणल्यानंतर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत देखील पक्षाचा हाच दबदबा कायम राखण्यासाठी शिंदे मैदनात उतरले असून, येत्या आठवडाभर आपल्या प्रचार सभांनी ते महाराष्ट्र पिंजून काढत पुन्हा एकदा पक्षाची यशस्वी घडदौड कायम राखण्यासाठी ते पूर्ण ताकतीने मैदानात उतरले आहेत.

गणेश नाईकांच्या ‘त्या’ विधानावर उदय सामंत यांचा थेट पलटवार; म्हणाले, शिंदेंनी उठाव केला नसता तर…”;

Web Title: Eknath shinde campaign launch mahabaleshwar zp panchayat samiti elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 09:53 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Election
  • shivsena
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Sindhudurg ZP Election : पावशी मतदारसंघात ठाकरे सेनेचा प्रचार शिगेला
1

Sindhudurg ZP Election : पावशी मतदारसंघात ठाकरे सेनेचा प्रचार शिगेला

गणेश नाईकांच्या ‘त्या’ विधानावर उदय सामंत यांचा थेट पलटवार; म्हणाले, शिंदेंनी उठाव केला नसता तर…”;
2

गणेश नाईकांच्या ‘त्या’ विधानावर उदय सामंत यांचा थेट पलटवार; म्हणाले, शिंदेंनी उठाव केला नसता तर…”;

Sindhudurg : कुडाळ तालुक्यात शिंदे शिवसेनेचा ठाकरे गटाला मोठा दणका
3

Sindhudurg : कुडाळ तालुक्यात शिंदे शिवसेनेचा ठाकरे गटाला मोठा दणका

Dharashiv News: एबी फॉर्म वादाने धाराशिव शिवसेनेत उघडी फूट; पालकमंत्र्यांसमोर तीन तास गोंधळ, महायुतीच्या जागावाटपावर प्रश्नचिन्ह
4

Dharashiv News: एबी फॉर्म वादाने धाराशिव शिवसेनेत उघडी फूट; पालकमंत्र्यांसमोर तीन तास गोंधळ, महायुतीच्या जागावाटपावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.