mp sanjay raut press confernce live on india pakistan war news
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून युद्ध सुरु आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर चवथाळलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमा भागातील राज्यांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने दलाने हे सर्व हल्ले परतून लावले असून पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावर आक्रमण केले आहे. यानंतर राज्यामध्ये देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी सैन्यामध्ये राजकारण आणू नका असे देखील म्हटले आहे.
भारताने पाकिस्तानाला जोरदार हल्ला करुन प्रत्युत्तर द्यावे अशी अपेक्षा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. युद्ध सुरु झाल्यानंतर त्यांनी भारतीय सेनेवर विश्वास व्यक्त केला आहे. खासदार राऊत म्हणाले की,”1971 पेक्षा आता पाकिस्तान कमजोर आहे. आपला सैन्य प्रोफेशनल आहे, टाईमपास करणार नाही. भारतामध्ये आपला लष्कर युद्धासाठी आणि भारताच्या रक्षणासाठी तयार असतं. गेल्या 72 तासात पाकिस्तानचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. अधिकृत माहिती येते त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. खोट्या बातम्या आणि अफवा पसरवून बंद ठेवल पाहिजे, त्याच्यामुळे सैन्याचा ग्लोबल खाली जाईल असं होऊ नये. आमचे सैनिक धडक मारायला समर्थ आहे. आम्ही आता आमच्या सैन्याचे सिक्रेट मीडियाच्या माध्यमातून जाहीर करणे ही माहिती शत्रूला का देतो हे टाळायला पाहिजे. युद्धाच्या वेळेला जनतेने आणि मीडियाने हे पाळावं. फेक न्युज, अफवा, प्रपोगांडा या तीन गोष्टी वरती सरकारने बंदी आणावी हे आम्ही काल सगळ्यांनी संरक्षण आणि गृहमंत्री यांना ठासून सांगितलं आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट घ्या जाणून
खासदार संजय राऊत यांनी राजनाथ सिंह यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सैन्यामध्ये राजकारण आणू नका. हे आम्ही सगळ्यांनी सांगितलं आणि त्या फेक न्युज पसरवला जातात. मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर बँन आणले पाहिजे. पाकिस्तानचा लष्कर हे कधीच प्रोफेशनल नाही. त्यांना युद्धाची ट्रेनिंग दिली जात नाही. त्यांच्यात लढण्याची क्षमता नाही. त्यांना राजकारणात सर्वात जास्त रस असतो ते भ्रष्टाचारी आहेत. आमच्या सैन्याकडे नीतिमता संयम आणि शौर्य आहे ही चांगली गोष्ट आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले जो पहिला हल्ला झाला त्याच्यामध्ये शंभराच्यावर दहशतवादी मारले. त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे कारण आपण हे प्रत्यक्ष पाहिले नाही आणि राजनाथ सिंग सांगत आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. दुसरा कोणी सांगितलं असतं तर आम्ही विश्वास ठेवला नसता, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
या युद्धाचा निचरा झाला की…
राज्यामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा सुरु आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, सुप्रिया सुळे काल माझ्याबरोबर दिल्लीमध्ये होत्या आणि आम्ही या विषयावर चर्चा केली त्यांच्या बोलण्यात मला असं काही जाणवलं नाही. शरद पवार साहेब ऑन रेकॉर्ड बोलले आहेत की ऑफ माहिती आहे. युद्ध सुरू आहे युद्धकाळात अशा चर्चा फार रंगवू नका. हे लहान युद्ध आहे, घरातली महाविकास आघाडीतील त्याच्याविषयी आता आम्ही चर्चा करणार नाही. या युद्धाचा निचरा झाला की आम्ही या युद्धाकडे वळू, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर संजय राऊत यांनी शिंदे गटावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, आमच्या पक्षात एक गट होता तुमच्या कुटुंबाला त्रास होतो आम्हाला तुरुंगा जावं लागेल आमच्या प्रॉपर्टी जप्त होतील. हे वय आमचं तुरुंगात जायचं नाही तेव्हा आपण भाजप बरोबर हात मिळवणे असा गट आमच्याकडे होता आणि तो गेला, असे गट ज्यांना सत्तेचा गोळा आला चिटकून जायचं असे वाटत प्रत्येक पक्षात असतात पण ती पोकळी भरून निघते. पोकळी भरून काढण्याचा काम महाविकास आघाडी करत आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला काय ताकद आहे हे शरद पवार यांना माहिती आहे. उद्धव ठाकरे सत्तेत कमी राहिले, विरोधी पक्षात राहिले तरी आमचे राजकारण सुरू आहे आम्ही सकारात्मक आहोत. एकत्र येत असताना आम्ही किंवा तुम्ही ज्याने महाराष्ट्रातल्या शत्रूचे संबंध चुपी हात मिळवणे करू नये आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मदत करू नये भूमिका आहे, असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी मित्रपक्षांना दिला आहे.