
MP Sanjay Raut target modi government ove nari shakti vandan vidheyek maharashtra politics
Maharashtra Politics : मुंबई : संसदेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाले आहे. संविधान दुरुस्तीचे हे विधेयक नामंजूर झाल्याने मोदी सरकारला (Modi Government) मोठा धक्का बसला आहे. मोदी सरकार आल्यापासून पहिल्यांदाच कोणते विधेयक नामंजूर झाल्याने हा भाजपसाठी झटका मानला जात आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने नियमबाह्य, बेकायदेशीर आणि निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होईल असे वर्तन करत असतात. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस फेल झाले असल्याची टीका खासदार राऊत (MP Sanjay Raut) यांनी केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले असून मोदी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, देशाचे नेतृत्व काँग्रेसशिवाय दुसरे कोणीही करू शकत नाही, हे मोदी आपल्या वर्तनातून वारंवार दाखवून देत आहेत. पंतप्रधान मोदींना खोटं बोलण्याचा एक भयंकर राष्ट्रीय आजार जडलेला आहे. मोदी सातत्याने नियमबाह्य, बेकायदेशीर आणि निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होईल असे वर्तन करत असतात, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : अक्षय तृतीयेचा सुवर्णयोग; सोने-चांदी व वाहनांचे प्री-बुकिंग फुल्ल, हजारो गाड्यांची आज डिलीव्हरी
विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी लाईव्ह येऊन देशवासियांशी संवाद साधला. यावरुन विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देश आता गांभीर्याने पाहत नाही. ५४३ जागा जर दिल्या तर भाजपमधील थोर पुरुषांच्या जागा राखीव होऊ शकतात, असा टोला त्यांनी लगावला. मोदींना देश कायम पेटवायचा असतो, मग तो विषय लव्ह जिहादचा असो किंवा कुणी काय खावे यावरून असो. पुलवामामध्ये जवान शहीद झाले, तेव्हा तिथल्या महिलांचा आक्रोश त्यांना दिसला नाही, आता ही ढोंगं त्यांनी बंद करावीत कारण जग त्यावर हसत आहे, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
हे देखील वाचा : ‘वंचित मुलांसाठी मोठं पाऊल! ‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यभर विस्तार; १२१ संस्थांतील मुलांना मानसिक आधार
खासदार संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रावर या बिलावरून कसा अन्याय झाला आहे हे स्पष्ट दिसते. दक्षिण भारतातील राज्यांवर अन्याय करून भाजप तोडा-फोडा आणि राज्य करा या तत्वाने वागत आहे, म्हणूनच आम्ही ठामपणे उभे राहिलो आहोत. आता टीसीएस (TCS) प्रकरणावरून देशावर संकट आले असताना, सर्व सूत्रे हिंदूंच्या हाती आहेत, मग ‘हिंदू खतरे मे’ कसे? जर खरोखरच कुणी धोक्यात असेल, तर आम्ही खंबीर आहोत. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र फेल आहेत. नरेंद्र मोदींचे ते चेले आहेत. देशात नरेंद्र मोदी फेल आहेत आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस फेल आहेत. ते फेलच आहेत. ते अपयशीच आहेत,” अशी टीका संजय राऊतांनी केली.