Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हे भटकती अन् लटकती आत्मा…”; दावोस दौऱ्यावेळी पक्षफोडीवर टीका करणाऱ्यांवर खासदार संजय राऊत भडकले

राज्याचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दावोस दौऱ्यावर गेले आहे. मात्र उदय सामंत यांनी तिथे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणावर टीका केल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 22, 2025 | 12:43 PM
Santosh Deshmukh Case : '...हे तर गृहखात्याचं अपयश'; संजय राऊतांची टीका

Santosh Deshmukh Case : '...हे तर गृहखात्याचं अपयश'; संजय राऊतांची टीका

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले आहेत. काही दिवसांपूर्वी महायुतीचे पालकमंत्री जाहीर झाले आहे. मात्र अनेक जिल्ह्याचे पालकमंत्रिपदावरुन नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. दादा भुसे व भरत गोगावले यांना मंत्रिपद न दिल्यामुळे शिंदे गटात नाराजीनाट्य सुरु आहे. यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. हे सर्व अतृप्त आत्मे आहेत, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

राज्यातील महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरुन नाराजीनाट्य सुरु आहे. यापूर्वी जागावाटप, मुख्यमंत्रिपद, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप अशा सर्वच बाबींवरुन महायुतीमध्ये वादंग निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे नाराज असून त्यांच्या मूळ गावी म्हणजेच दरे गावी गेले असल्याचे बोलले जात आहे.  त्या मुद्यावरून खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि महायुतीमधील नेत्यावंर टीकास्त्र सोडले आहे. तसेच राज्यातील मंत्री दावोस दौऱ्याला गेले असून महाराष्ट्राच्या राजकारणावर टीका करत असल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

खासदार संजय राऊत म्हणाले की, “यांनी कुठेतरी समाधाना माना, ज्या ईव्हीएमने तुम्हाला एवढा मोठा विजय दिला, त्याचं समाधान माना, महाराष्ट्राची प्रतिमा सांभाळा, असा टोला खसादार संजय राऊत यांनी लगावला आहे. दावोसमध्ये बसून तुम्ही पुन्हा पक्ष फोडण्याची भाषा करत आहात, लाज कशी वाटत नाही तुम्हाला ? मरण पत्करू पण यांना शरण जाणार नाही अशी आमच्या आमदार-खासदारांची भूमिका आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ते बेईमान शेण खायला गेले यांच्यासोबत…

खासदार संजय राऊत म्हणाले की, “ज्यांना जायचं ते बेईमान शेण खायला गेले यांच्यासोबत, पण आम्ही कशाला जाऊ ? आम्हाला या मराठी मातीचा स्वाभिनमान आहे, बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे घडवलंय त्याचा आम्हाला अभिमान आहे. तिकडे ते काय करत आहेत ? तिथे ते शिंद्यांचेच आमदार फोडायला गेले आहेत. उदय सामंत हे भटकती आणि लटकती आत्मा आहेत, मुख्यमंत्री यांनी उद्योगमंत्री यांच्याकडून या दौऱ्याचा खर्च वसूल केला पाहिजे. तुम्ही स्वत: फुटलात, बेईमान झालात ना, तुमच्या कपाळावर बेईमानीची पट्टी लागली आहे. आता फक्त त्यांनी एवढंच सांगणं बाकी आहे की संजय राऊत, आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदेंना भेटलेत, सगळेच फुटणार आहेत, हे पवार साहेबांना भटकती आत्मा म्हटले होते, पण हे स्वत:च भटकती आणि लटकती आत्मा आहेत,” अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी उदय सामंतांवर घणाघात केला आहे.

Web Title: Mp sanjay raut target uday samant for criticism of party split during davos visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • sanjay raut

संबंधित बातम्या

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
1

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले
2

Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
3

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
4

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.