धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? सुरेश धसांच्या टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट
बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेला दोन महिने होत आले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी फरार असून वाल्मीक कराड याला देखील न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावर मंत्री धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वाल्मीक कराड याच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे यांचे अर्थिक संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी राजकीय वर्तुळातून केली जात आहे. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याचा परिणाम म्हणून धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकत्व देखील नाकारण्यात आले आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधून बीड हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बीडच्या पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ यांचा 49 वा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जात आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. मात्र यामध्ये पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती चर्चेचे कारण ठरली. महापूजेनंतर धनंजय मुंडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड हत्या प्रकरणावरुन सरकारला घेरले आहे. दमानिया यांनी तुरुंगात असलेल्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना वेगळी ट्रीटमेंट मिळतेय असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. त्यावर धनंजय मुंडे बोलले. “या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही. मला प्रश्न विचारु नका. मी स्पष्टपणे सांगितलय, जे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे हत्यारे आहेत, त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. त्यांना तात्काळ फाशी द्या. कोणी काय म्हणावं हा विषय वेगळा. तुम्हाला बातमी, टीआरपी पाहिजे. त्याशिवाय जाहीराती मिळत नाहीत, जाहीरातीला रेट मिळत नाही. पोलिसांकडून योग्य तपास सुरु आहे” असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आरोपींना तुरुंगामध्ये सेवा पुरवल्या जात असल्याचा आरोप केला आहे. अंजली दमानिया यांनी लिहिले आहे की, “विष्णू छाटे सारख्या गुन्हेगाराला जेल चा चॉइस? विष्णु चाटे ने बीड येवजी लातुर कारागृहाची मांगणी का केली आणि ती त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली? १) 1st सुभेदार – नारायण मुंडे (जवळचे नातेवाईक) २) मुरलीधर गित्ते (बंदुक वाल्या फडचा मेव्हणा) ३) श्रीकृष्ण चौरे ( मावसभाऊ व 5 पोकलेनचा मालक) सगळे मर्जीतले ? हा आरोप समजा विरुद्ध नक्कीच नाही ह्याची नोंद घ्यावी. असे जेल आरोपी / गुन्हेगार का मागतो या साठी दिलेले कारण समजून घ्यावे ही माहिती मिळाल्यावर मी नावांची चौकशी केली. ती आहेत असे मला सांगण्यात आले. नाती आहेत की नाही ते कन्फर्म करता येत नाही स्पेशल ट्रीटमेंट ची सुरुवात कारागृहाच्या आगमनापासुनच सुरुवात ताबडतोब ही पूर्ण चौकशी मुंबईला हलवा आणि त्या गुन्हेगाराला पण मुंबईला आर्थर रोड जेल मधे ठेवा. आज मी ही मागणी ADG संजय सकसेना यांच्याकडे भेटून केली. उद्या DG रश्मी शुक्ला यांची सकाळी भेट घेणार आहे,” असे अंजली दमानिया म्हणाल्या होत्या.