आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार
मुंबई – राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राजकारण रंगलं असून समीकरणे बदलताना दिसत आहेत. यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जात असताना महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल लागला. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. तर महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु असून यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचे बंधू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत एका लग्न समारंभात भेट झाली, मागील काही आठवड्यांमधील ही तिसरी भेट आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी दोघांमधील राजकीय मतभेद मिटण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले संजय राऊत?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार का? याबाबत माध्यमांनी खासदार संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला देखील आनंदच होतो. अशा त्यांच्या भेटी वारंवार घडाव्यात आणि लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा. यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. कुणी कितीही उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहेत. अमित शहा आणि मोदी यांनी ठरवलं आहे महाराष्ट्रातून ठाकरे ब्रँड हा संपवायचा आहे. पण कोणी कितीही उड्या मारल्या तरी ठाकरे हा ब्रॅंड मिटवता येणार नाही, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, ठाकरे हा ब्रॅंड मिटवण्याचे अमित शहा यांचे स्वप्न आहे. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस चोरांचा पक्ष स्थापन झाला. हा प्रश्न राजकीय आहे आमच्या मध्ये व्यक्तिशः नाती आहेत त्यामध्ये कुठेही वाद नाही. महाराष्ट्राच्या शत्रूशी कुणीही हात मिळविणी करू नये हेच आमचे मत आहे. ज्यांनी शिवसेनेचे तुकडे केले पक्ष विकत घेतला आणि शिंदेच्या हातात सोपविला अशा प्रवृत्तींशी कोणत्याही प्रकारे कोणत्याही संबंध ठेवू नये हात मिळविणे करू नये अशी आमची भूमिका आहे. कोणत्याही ठाकरेंनी अशाप्रकारे हात मिळविणी करणे ही महाराष्ट्राच्या 106 हुतात्म्यांशी बेईमानी करणे असा आमचं मत आहे, असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.