
MP Sanjay Raut live target bjp mp nishikant dubey political news
Maharashtra Politics : मुंबई : संसदेमध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना यासंबंधित विधेयक सादर करण्यात आले आहे. यावर चर्चा करण्यासाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. मात्र यावरुन जोरदार राजकीय वादंग निर्माण झाला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांवर निशाणा साधला. त्यांनी संसदेमध्ये आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ब्रिजभूषण सिंह आणि कुलदीप सेंगर यांचा उल्लेख केला. यामुळे दुबेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. यावर भाजपने काही भुंकणारी कुत्री पाळली असल्याचे म्हणत खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच आदित्य ठाकरेंवर संसदेमध्ये करण्यात आलेल्या गंभीर टीकेवर देखील प्रत्युत्तर दिले. खासदार राऊत म्हणाले की, एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्ष हा महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात, महिलांना त्यांचे हक्क देण्यासंदर्भात एक बिल सर्वानुमते मंजूर करावं अशी भूमिका काल पंतप्रधानांनी मांडली. महिलांच्या आरक्षणामध्ये आणि सुरक्षेच्या मुद्यामध्ये, महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत ज्या भाजपच्या एका नेत्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे आणि तो तुरूंगात आहे. संसदेमध्ये भाजपचा एखादा खासदार जर त्याचं समर्थन करत असेल, तर या आरक्षणाच्या बिलावर चर्चा सुरू होण्याआधी त्यांनी त्या खासदारावर कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षा राऊतांनी व्यक्त केली.
हे देखील वाचा : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेवरुन रणकंदन; लोकसभेत राहुल गांधी घेणार खरपूस समाचार
पुढे ते म्हणाले की, महिलांवर बलात्कार करून तुरूंगात गेलाय, त्याचं समर्थन पार्लमेंटमध्ये होत असेल तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे याप्रकरणात दिसतंय. आम्हाला या विषयावर आता फार चर्चा करायची नाहीये. आम्ही त्यावर योग्यवेळी भूमिका घेऊ,असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
मोदींचा भाजप किती खालच्या पातळीवर गेला- राऊत
पुढे संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंचे संसदेमध्ये नाव घेण्याची गरज नव्हती. फक्त ठाकरे कुटुंबाची आणि शिवसेनेची बदनामी करण्यासाठी जे कुंभाड रचण्यात आलं, त्यामध्ये आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यात आलं, अशी भूमिका मांडली. पुढे ते म्हणाले की, एकदा भाजपच्या खासदाराने भाजपच्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन काल संसदेमध्ये केलं. अशा प्रकारे पार्लमेंटचा गैरवापर करणं हे अत्यंत दु:खद आहे. आणि नरेंद्र मोदींचा भाजप किती खालच्या पातळीवर गेला आहे, हे काल पुन्हा एकदा पाहिलं.लदीप सेनगरसारख्या बलात्कारी,महिलांवर अत्याचार करणआऱ्या तुमच्या नेत्याची बाजू मांडता. आणि दुसरीकडे तुम्ही लोकांकडे महिला आरक्षणासंबंधी समर्थन मागता, हे ढोंग आहे, अशा कडक शब्दांत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.
हे देखील वाचा : EDच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपची चाल? AAP मंत्री संजीव अरोरा यांच्या घरावर छापा
पुढे राऊतांनी दुबेंवर अप्रत्यक्षपणे टीका करत म्हटले की, ‘असे काही भुंकणारे कुत्रे पाळून ठेवलेत भाजपने, मराठी माणसावर भुंकण्यासाठी. या महाराष्ट्रातील भाजपच्या मराठी नेत्यांना लाज वाटली पाहिजे. जर दुसऱ्या एखाद्या भाजपच्या नेत्यावर आक्रमण कोणी केलं असतं तर आम्ही उभे राहिलो असतो. पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर, ठाकरे कुटुंबावर ज्यांनी या महाराष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केलं , त्या कुटुंबावर अशा प्रकारे दुबे-फुबे सारखी लोकं बोलत असतील आणि भाजपचे लोक मजा बघ असतील, तर एक दिवस हे तुमच्यावरही उलटणार आहे, असा इशारा खासदार संजय राऊतांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे.