MP Supriya Sule protest outside Pune District Collector Office for Baneshwar Nasrapur road poor condition
पुणे : मुंबई व पुण्यासारख्या शहरांमध्ये रस्त्यांचे काम व मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामुळे नागरिकांची एका बाजूला गैरसोय होत आहे. तर गावांमध्ये मात्र रस्त्यांची अशरक्षः दुराव्यस्था झाली आहे. अवकाळी पावसाचा देखील रस्त्यांना मोठा फटका बसला आहे. भोर तालुक्यातील रस्त्यांची देखील बोळवण झाली आहे. यामुळे खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनला बसल्या आहेत. भर उन्हामध्ये डोक्यावर पदर घेऊन खासदार सुळे या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाला बसल्या आहेत.
भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून उपोषण सुरू केले आहे. बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे क्राँक्रिटीकरण करण्याची मागणी केली आहे. अनेकदा पाठपुरवठा करुन देखील हे काम केले जात नसल्यामुळे खासदार सुळे यांनी आंदोलनाची वाट धरली आहे. प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात मात्र कामाला सुरुवात केली जात नाहीये. यामुळे देवस्थानाला भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांची आणि भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, क्षेत्र बनेश्वर देवस्थान हे अनेकांच्या आस्थेचा प्रश्न आहे. हा केवळ दीड किलोमीटरचा रस्ता आहे. आम्ही अनेकदा हा रस्ता नीट करावा किंवा त्याची डागडुजी तरी करावी. मात्र प्रशासनाकडून हा PMRDA चा प्लॅन आहे असे सांगितले जाते. मात्र तो 800 कोटीचा प्लॅन आमच्या पदरी कधी पडणार. लाखो लोक आणि शिवभक्त बनेश्वरला दर्शनाला जातात. मुलांच्या सहली जातात. या दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी आम्ही वणवण फिरत आहोत. सगळी शासकीय कार्यालये झाली. मात्र तरी हा रस्ता प्रशासनाकडून करुन दिला जात नाही, अशी तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
📍जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे ⏭️ 09-04-2025 ➡️ भोर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात उपोषण – लाईव्ह https://t.co/hbvV0sBt9o
— Supriya Sule (@supriya_sule) April 9, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, प्रशासनाकडून आम्हाला शब्द देण्यात आला होता की आम्ही ते काम सुरु करुन देऊ. 03 मार्च रोजी पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुढील एक आठवड्यात हा रस्ता दुरुस्त केला जाईल. मात्र हा नसरापूर ते बनेश्वर देवस्थान दीड किलोमीटरचा रस्ता बनवून देण्यासाठी सरकार या सर्व नागरिकांना खूप छळत आहे. पैसे ही एकच अडचण आहे. रस्ता नवीन सुद्धा मागत नाहीये. खड्डे असणारा रस्ता केवळ नीट करा एवढीच आमची मागणी आहे. एवढं तरी करा. आम्हाला यामध्ये राजकारण करायचं नाही, आम्हाला केवळ रस्त्याची दुरुस्ती हवी आहे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत कामाचे वर्क ऑर्डर निघत नाही, तोपर्यंत मी उपोषणावर ठाम राहणार आहे. सध्या ऊन वाढत चाललं आहे. मी अन्न खाणार नाही, असा आक्रमक पवित्रा खासदार सुळे यांनी घेतला आहे.